अर्थ मंत्रालय

डिसेंबर 2021 मध्ये  देशाचे सकल GST महसूल संकलन 1,29,780 कोटी रुपये


गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 टक्के वाढीसह संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक 19,592 कोटी रुपयांचा वाटा

Posted On: 01 JAN 2022 1:40PM by PIB Mumbai

 

डिसेंबर 2021 मध्ये देशाचे सकल जीएसटी संकलन 1,29,780 कोटी रुपये झाले असून त्यामध्ये सीजीएसटी 22,578 कोटी रुपये, एसजीएसटी 28,658 कोटी रुपये, आयजीएसटी 69,155 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 37,527 कोटी रुपयांसह) आणि  9,389 कोटी रुपये अधिभाराचा (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या रु. 614 कोटींसह) समावेश  आहे

सरकारने नियमित तडजोडीचा भाग म्हणून सीजीएसटीपोटी 25,568 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 21,102 कोटी रुपयांची तडजोड केली आहे. डिसेंबर 2021 साठी केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 48,146 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 49,760 कोटी रुपये इतका आहे.

डिसेंबर 2021 मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 13% नी जास्त आहे आणि डिसेंबर 2019 मधील जीएसटी महसुलापेक्षा 26% नी जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 36% नी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत  5% नी जास्त आहे.

ऑक्टोबर, 2021 च्या तुलनेत (7.4 कोटी)  नोव्हेंबर, 2021 महिन्यात ई-वे बिल्सच्या संख्येत 17% घट होऊनही (6.1 कोटी)  महिन्यातील जीएसटी संकलन 1.30 लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. सुधारित कर अनुपालन आणि केंद्र आणि राज्य या दोन्ही कर प्राधिकरणांच्या उत्तम कर प्रशासनामुळे हे संकलन झाले आहे.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत अनुक्रमे 1.10 लाख कोटी आणि 1.15 लाख कोटी रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत 1.30 लाख कोटी रुपयांचे सरासरी मासिक सकल जीएसटी संकलन झाले आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने, करचुकवेगिरी विरोधात केलेल्या कारवाया, विशेषत: बनावट पावत्या देणाऱ्यांविरुद्धची कारवाई यामुळे जीएसटी संकलनात वाढ होत आहे.  उलट्या शुल्क संरचनेत सुधारणा करण्यासाठी परिषदेने केलेल्या दर तर्कसंगत करण्याच्या  विविध उपायांमुळेही महसुलात सुधारणा झाली आहे. अखेरच्या तिमाहीतही महसुलातील सकारात्मक कल कायम राहील अशी अपेक्षा आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलाचा कल दर्शविला आहे. डिसेंबर 2020 च्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये प्रत्येक राज्यात जमा झालेल्या जीएसटी ची राज्यनिहाय आकडेवारी सारणीमध्ये दिसत आहे.

यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 19,592 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असून डिसेंबर 2020 मधील 17,699 कोटी रुपयांच्या तुलनेत ते 11 % नी जास्त आहे. गोवा राज्यात 592 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असून डिसेंबर 2020 मधील  342 कोटी रुपयांच्या तुलनेत ते 73 % नी जास्त आहे.

 

 

State-wise growth of GST Revenues during December 2021

State

Dec-20

Dec-21

Growth

Jammu and Kashmir

318

320

0%

Himachal Pradesh

670

662

-1%

Punjab

1,353

1,573

16%

Chandigarh

158

164

4%

Uttarakhand

1,246

1,077

-14%

Haryana

5,747

5,873

2%

Delhi

3,451

3,754

9%

Rajasthan

3,135

3,058

-2%

Uttar Pradesh

5,937

6,029

2%

Bihar

1,067

963

-10%

Sikkim

225

249

11%

Arunachal Pradesh

46

53

16%

Nagaland

38

34

-12%

Manipur

41

48

18%

Mizoram

25

20

-23%

Tripura

74

68

-9%

Meghalaya

106

149

40%

Assam

984

1,015

3%

West Bengal

4,114

3,707

-10%

Jharkhand

2,150

2,206

3%

Odisha

2,860

4,080

43%

Chhattisgarh

2,349

2,582

10%

Madhya Pradesh

2,615

2,533

-3%

Gujarat

7,469

7,336

-2%

Daman and Diu

4

2

-60%

Dadra and Nagar Haveli

259

232

-10%

Maharashtra

17,699

19,592

11%

Karnataka

7,459

8,335

12%

Goa

342

592

73%

Lakshadweep

1

1

170%

Kerala

1,776

1,895

7%

Tamil Nadu

6,905

6,635

-4%

Puducherry

159

147

-8%

Andaman and Nicobar Islands

22

26

18%

Telangana

3,543

3,760

6%

Andhra Pradesh

2,581

2,532

-2%

Ladakh

8

15

83%

Other Territory

88

140

58%

Centre Jurisdiction

127

186

47%

Grand Total

87,153

91,639

5%

***

Jaydevi PS/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786792) Visitor Counter : 351