माहिती आणि प्रसारण मंत्रालय
2021 मधील प्रसार भारती – डिजिटल/टीव्ही प्रेक्षकांच्या संख्येत वाढ
Posted On:
31 DEC 2021 4:45PM by PIB Mumbai
2021 या वर्षात प्रसार भारतीने दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन नेटवर्कद्वारे, प्रेक्षकांच्या पसंतीचे आशयघन कार्यक्रम त्यांच्या संबंधित प्रादेशिक भाषा आणि बोलींमध्ये प्रसारित करून त्यांना कशी माहिती दिली आणि त्यांचे कसे मनोरंजन केले यावर एक दृष्टिक्षेप टाकूया .
2021 मध्ये, दूरदर्शनच्या लोकप्रियतेने नवीन उंची गाठली, देशभरातील डीडी वाहिन्यांची एकूण प्रेक्षकसंख्या 6 अब्जांपेक्षा जास्त झाली आहे. या वाहिन्या 2021 मध्ये 680 दशलक्षाहून अधिक दर्शकांपर्यंत पोहोचल्या.
190 पेक्षा अधिक देशांत असलेल्या प्रेक्षकांसह, 2021 मध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या 185 हून अधिक YouTube चॅनेलने एकत्रितपणे अब्जाहून अधिक व्ह्यूज नोंदवले आहेत. 2021 च्या संपूर्ण कालावधीसाठी त्यांचा 'टीव्ही पाहण्याचा वेळ' 94 दशलक्ष तासांइतका आहे.
जगभरातील 190 हून अधिक देशांमध्ये आणि 790 शहरांमध्ये लोकप्रियता वाढत असल्याबद्दल धन्यवाद . प्रसार भारतीच्या NewsOnAir अॅपने 2021 मध्ये 214 दशलक्षहून अधिक श्रोत्यांची पसंती मिळवली. तुम्ही अॅप येथे डाउनलोड करू शकता - https://prasarbharati.gov.in/get-apps/
महामारीच्या कठीण काळात सार्वजनिक प्रसारकाने आपल्या लोक सेवेची जबाबदारी पार पाडताना कोविड जागरूकता संदेश, डॉक्टरांशी मोफत सल्लामसलत आणि महत्त्वाची सरकारी मार्गदर्शक तत्त्वे देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करून, लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . ही माहिती अनेक भारतीय भाषा आणि बोलींमध्ये प्रसारित केली गेली. ट्रायची आकडेवारी पुढीलप्रमाणे -
Covid-19 related coverage in 2021 on Doordarshan Network
|
S.No
|
Content Type
|
Count
|
Duration (In Hrs)
|
Reach (in Million)
|
1
|
Social Messages
|
34K
|
532+
|
95 M+
|
2
|
Promo
|
384K
|
106+
|
6 M +
|
3
|
Special Program
|
3.8K
|
1685+
|
43 M +
|
4
|
News Bulletins
|
59K
|
22775+
|
356 M+
|
तुमच्या आवडीच्या भारतीय भाषेत तुम्ही Twitter आणि YouTube वर प्रसार भारती नेटवर्कशी कसे जोडले जाऊ शकता त्याबाबत इथे माहिती दिली आहे. प्रसार भारती नेटवर्कवरील सर्व ट्विटर हँडल्सची यादी/लिंक - https://twitter.com/i/lists/173524864?s=20. प्रसार भारती नेटवर्कवरील सर्व YouTube चॅनेलची यादी/लिंक - https://newsonair.com/live-tv-dd-channels/
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786787)
Visitor Counter : 193