वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आव्हानात्मक स्थितीतही भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या दशकात स्थिर गतीने वाढ
अपेडाच्या अखत्यारीत येणाऱ्या उत्पादनांची निर्यात 2011-12 मधील 17,321दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सवरून 2020-21 मध्ये 20,674 दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सवर पोहोचली
बिगर बासमती आणि बासमती तांदूळ, म्हशी चे मांस या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीचा अपेडा अंतर्गत निर्यातीत मोठा हिस्सा आहे
Posted On:
31 DEC 2021 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2021
आव्हानांना न जुमानता भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या दशकात स्थिर गतीने वाढ झाली आहे.
कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, अपेडाच्या (APEDA)अखत्यारीत येणाऱ्या उत्पादनांची निर्यात 2011-12 मधील 17,321दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सम्हणजे (रुपये15,30,50 कोटी) वरून 2020-21 मध्ये 20,674 दशलक्ष अमेरिकन डाॅलर्सवर म्हणजे (83,484कोटी रुपये)पोहोचल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक विदा आणि संख्याशास्त्र प्राधिकरणाने (DGCI&S) दिली आहे.
भारतातील कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या अपेडा अंतर्गत निर्याती पैकी सर्वोच्च निर्यात होणारे जिन्नस म्हणून गैर-बासमती तांदूळ असून , 2020-21 मधील एकूण निर्यातीपैकी या तांदळाचा हिस्सा एक चतुर्थांश आहे.
2020-21 मध्ये अपेडा निर्यात बास्केटमधील तीन उच्च उत्पादने म्हणजे गैर-बासमती तांदूळ (23.22% हिस्सा), बासमती तांदूळ (19.44%) आणि म्हशीचे मांस (15.34%) आणि या उत्पादनांचा एकूण शिपमेंटपैकी 58 टक्के वाटा आहे.
“आम्ही कृषी निर्यात धोरण, 2018 चे उद्दिष्ट विचारात घेऊन राज्य सरकारांच्या सहकार्याने सामूहिक पद्धतीने लक्ष केंद्रित केले असून निर्यातीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहोत,असे अपेडाचे अध्यक्ष,डॉ एम अंगमुथू, यांनी यावेळी सांगितले. कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अपेडा राज्य सरकारांच्या संपर्कात आहे महाराष्ट्रासह 16 राज्यांनी निर्यातीसाठी राज्य विशिष्ट कृती आराखड्याला अंतिम स्वरूप दिले आहे तर इतर राज्यांचे कृती आराखडे अंतिम टप्प्यात आहेत.
अपेडाने भौगोलिक निर्देशांक (GI) नोंदणीकृत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यान्न उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील प्रमुख आयातदार देशांसोबत कृषी आणि खाद्य उत्पादनांवर आभासी खरेदीदार विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यासह अनेक उपक्रम पुढाकार घेऊन केले आहेत.
निर्यात केल्या जाणार्या उत्पादनांचे गुणवत्ता प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी, अपेडाने उत्पादनांची विस्तृत श्रेणी आणि निर्यातदारांना चाचणी सेवा प्रदान करण्यासाठी भारतभरात 220 प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे.
निर्यातीला चालना देण्यासाठी, अपेक्षा विविध आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल विश्लेषणात्मक माहिती संकलित करून या बाजारपेठेत निर्यातदारांना प्रवेश करण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि व्यापारी चौकशीचे पत्ते अपेडा प्रकाशित करते.
TABLE: Export Trend
Year
|
Rs Crores
|
USD Million
|
2011-12
|
83484
|
17321
|
2012-13
|
118251
|
21740
|
2013-14
|
136921
|
22707
|
2014-15
|
131343
|
21489
|
2015-16
|
107483
|
16421
|
2016-17
|
113858
|
17022
|
2017-18
|
125858
|
19524
|
2018-19
|
135113
|
19407
|
2019-20
|
119401
|
16700
|
2020-21
|
153050
|
20674
|
Source: DGCIS, data about APEDA Products
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786576)
Visitor Counter : 302