गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन
प्राधान्य कॉरीडॉरची सर्व 9 स्थानके हरित भवन परिषदेच्या प्लॅटिनम मानांकनाने प्रमाणित
प्राधान्य कॉरीडॉरचे काम 2 वर्षापेक्षाही कमी कालावधीत पूर्ण
Posted On:
28 DEC 2021 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. नागरी परिवहनात सुधारणा करणे हे सरकारने लक्ष केंद्रित केलेल्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक आहे. कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण खंडाचे उद्घाटन हे या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
आयआयटी कानपूर ते मोती महल हा 9 किमीचा मार्ग पूर्ण झाला असून कानपूर मधल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची संपूर्ण लांबी 32 किमी असून 13 किमीच्या 2 भुयारी कॉरीडॉरचा यात समावेश आहे. 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च यासाठी येणार आहे. कॉरीडॉर 1 मध्ये 21 मेट्रो स्थानके आणि कॉरीडॉर 2 मध्ये 8 मेट्रो स्थानके असतील .
गंगा नदीच्या काठावर वसलेले कानपूर हे उत्तर प्रदेशातले औद्योगिक शहर आहे. हे शहर प्रामुख्याने चामडे आणि लोकर उद्योगासाठी ओळखले जाते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमधले कानपूरचे योगदानही चिरपरिचित आहे. अनेक नामांकित संस्थांसह शिक्षणाच्या क्षेत्रातही हे शहर अग्रगण्य आहे. कानपूरची सध्याची लोकसंख्या 51 लाख असून 2041 पर्यंत ती 65 लाख होईल असा अंदाज आहे.
कानपूर शहरातल्या मोठ्या प्रमाणातल्या विकासामुळे इथे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गतिमान आणि विना अडथळा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करून त्याच्या अंमलबजावणीची आवश्यकता दीर्घ काळापासून होती. ही आवश्यकता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने जागतिक तोडीच्या कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला.
आज उद्घाटन करण्यात आलेल्या कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या आयआयटी कानपूर ते मोती महल या 9 किमी मार्गावर 9 मेट्रो स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी 11076.48 कोटी रुपये खर्च येणार असून to पूर्ण होण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे.
कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात दोन कॉरीडॉरचा समावेश आहे. आयआयटी कानपूर ते नौबस्ता हा 23.8 किमीचा पहिला कॉरीडॉर तर चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठ ते बर्रा हा 8.6 किमीचा दुसरा कॉरीडॉर आहे.
Name of Corridor
|
Length of Corridor (km)
|
Number of stations
|
Elevated
|
Underground
|
Total
|
Elevated
|
Underground
|
Total
|
IIT Kanpur to
Naubasta
|
15-2
|
8-6
|
23-8
|
14
|
7
|
21
|
Agriculture University
to Barra-8
|
4-2
|
4-4
|
8-6
|
4
|
4
|
8
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रकल्पाच्या, आयआयटी कानपूर ते मोती महल या कॉरीडॉर – 1 च्या 9 किमी लांबीच्या प्राधान्य मार्गाच्या बांधकामाचे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 15.11.2019 ला उद्घाटन केले होते. कोविडच्या दोन लाटांमध्येही कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाने बांधकामाची आपली गती कायम राखत सर्व अडथळे आणि आव्हानांवर मात केली. युपीएमआरसीच्या चमूने सिव्हील, ट्रॅक, सिग्नलिंग, उद्वाहक आणि सरकते जिने, प्राधान्य कॉरिडॉरचे ट्रॅक्शन काम 2 वर्षापेक्षाही कमी काळात पूर्ण केले.
कोविड -19 महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रकल्प कार्यात आलेल्या अडथळ्यावर मात करत ट्रायल रन अर्थात चाचणी घेण्यात आली. बांधकाम सुरु झाल्यापासून दोन वर्षा पेक्षा कमी काळात घेण्यात आलेली ही ट्रायल रन म्हणजे एक विक्रम आहे.
प्राधान्य कॉरीडॉरच्या सर्व 9 स्थानकांना हरित इमारत परिषदेचे प्लॅटिनम मानांकनाने प्रमाणित करण्यात आले आहे. कानपूर मेट्रोचा 9 किमीचा पट्टा हरित भवन संहितेला अनुसरत बांधण्यात आल्याने पर्यावरणासाठी सुरक्षित आहे. हरित भवन संहितेला अनुसरत केलेले बांधकाम आणि निकष यामुळे याला पर्यावरण व्यवस्थापनासाठी ISO-14001 आणि सुरक्षितता व्यवस्थापनासाठी ISO-45001 प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.
दुहेरी T गर्डर : देशात प्रथमच एलेव्हेटेड मेट्रो स्थानकाच्या प्रशस्त हॉल साठी दुहेरी T गर्डरचा वापर करण्यात आला आहे.
ट्वीन पियर कॅप : डेपो प्रवेश/ बहिर्गमन लाईनसाठी देशात प्रथमच पोरात्ल व्यवस्थेऐवजी ट्वीन पियर कॅपचा उपयोग करण्यात आला आहे.
* * *
S.Kane/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785929)
Visitor Counter : 230