पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते बिना (मध्यप्रदेश) पंकी (उत्तरप्रदेश) इथे बहुउत्पादन पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन
या प्रकल्पाची एकूण किंमत 1524 कोटी रुपये
या प्रकल्पामुळे पूर्व उत्तरप्रदेश, मध्य उत्तरप्रदेश, उत्तर बिहार आणि उत्तराखंडच्या दक्षिण भागाला मिळणार लाभ
बांधकामाच्या टप्प्यात, पाच लाख मानवदिन इतक्या कालावधीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती
Posted On:
28 DEC 2021 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2021
मध्यप्रदेशातील बिना तेलशुद्धीकरण प्रकल्पापासून ते उत्तरप्रदेशातील, कानपूर पंकी इथल्या पीओएल टर्मिनलपर्यंतच्या बहुप्रकल्प पाईपलाईन सुविधेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. 356 किमी लांबीच्या या प्रकल्पाची वर्षिक क्षमता, सुमारे 3.45 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे. या प्रकल्पात, साठवणूक क्षमतेचा विस्तारही करण्यात आला आहे. तसेच, पंकी इथल्या पीओएल टर्मिनलवरून रेल्वे मालवाहतुकीचीही व्यवस्था आहे.
या प्रकल्पाची एकूण किंमत 1524 कोटी आहे (यापैकी 1227 कोटी उत्तरप्रदेशातील आणि 297 कोटी मध्यप्रदेशचे) या प्रकल्पाचा लाभ उत्तरप्रदेशातील पाच जिल्ह्यांना होणार आहे. यात ललितपूर, झाशी, जलांऊ, कानपूर देहात, कानपूर नगर यांचा समावेश असून, मध्यप्रदेशातल्या सागर आणि टिकमगढ या दोन जिल्ह्यांना होणार आहे.
हा प्रकल्प डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तो प्रस्तावित उद्दिष्टाच्या एक महिना आधीच पूर्ण होऊन त्याचे लोकार्पणही करण्यात आले. या पाईपलाईनमुळे, बिना तेलशुद्धीकरण प्रकल्पातून तेल उत्खनन शक्य होणार आहे. तसेच उत्तरप्रदेश, बिहार आणि उत्तराखंड मधील काही जिल्ह्यांना पेट्रोलियम उत्पादने मिळणार आहेत.
या प्रकल्पात, 18 इंच व्यासाची , 356 किमी लांब बहु-प्रकल्प पाईपलाईन असून त्यात बिना टर्मिनल मधून 3.5 MMTPA ची क्षमता असून त्याचे वहन पंकी, कानपूर इथल्या पीओएल टर्मिनल पर्यंत होणार आहे. यातून, MS, HSD & SKO या पदार्थांचे वहन केले जाणार आहे. त्याशिवाय इतर सुविधा खालीलप्रमाणे :--
A. बिना इथे पाईपलाईन डिस्पॅच टर्मिनलचे बांधकाम .
B. पंकी (कानपूर) इथे पाईपलाईनचे शेवटच्या टर्मिनलचे बांधकाम. यात, साठवणूक क्षमता 30400 केएल वरुन 167200 केएल पर्यंत वाढवण्यात आली आहेत.
C. रेल्वे वहन व्यवस्था
D. 11 एसव्ही स्टेशन्स आणि एक मध्यम पिगिंग स्थानके पाईपलाईन मार्गावर बांधण्यात आली आहेत.
प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान पाच लाख मानवदिन रोजगार निर्मिती झाली होती . या प्रकल्पाच्या परिचालन आणि देखरेखीदरम्यान आणखी 200 लोकांना रोजगार मिळेल.
या पाईपलाईन सुरक्षित आणि पर्यावरण पूरक असून, मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करण्याची प्रकल्पाची क्षमता आहे.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785876)
Visitor Counter : 305