ग्रामीण विकास मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत देशभरात रोजगार मेळाव्यांचे आयोजन
30 प्रमुख क्षेत्रातील प्रमुख उद्योजक या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी
Posted On:
26 DEC 2021 12:29PM by PIB Mumbai
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानाचा एक भाग म्हणून 17 ते 23 डिसेंबर 2021 या कालावधीत देशभरात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यांमध्ये 30 प्रमुख क्षेत्रातील उद्योजकांनी सहभाग घेतला. ग्रामविकास मंत्रालयाच्या दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (डीडीयु -जीकेवाय ) कार्यक्रमांतर्गत आयोजित या रोजगार मेळाव्यांना विविध राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (एसआरएलएम ) आणि प्रकल्प अंमलबजावणी संस्था (पीआयए ) यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे भरवण्यात आले.
हा कार्यक्रम सध्या 27 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येत आहे आणि 1891 प्रकल्पांमध्ये 2369 हून अधिक प्रशिक्षण केंद्रे आहेत, 877 हून अधिक प्रकल्प अंमलबजावणी संस्थांच्या भागीदारीच्या माध्यमातून 57 क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आयोजित केले जाते आणि 616 हून अधिक क्षेत्रात रोजगारच्या संधी उपलब्ध आहेत. दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कार्यक्रमांतर्गत सुरुवातीपासून एकूण 11.15 लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि 7.13 लाख उमेदवार प्रशिक्षित झाले आहेत
दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित झालेले आणि अन्य नोकरीच्या शोधात असलेले लाखो उमेदवार या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी झाले होते. सुमारे 278 हून अधिक संस्थांच्या सहभागाने देशभरात अशा सुमारे 285 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. अमेझॉन इंडिया, स्वीगी, मेड प्लस, ऍक्सीस बँक, किया मोटर्स, इनोव्हसोर्स, फ्लिपकार्ट, नाना भारत फर्टिलायझर्स, रिलायन्स ट्रेंड्स, वेस्टसाईड, स्पेन्सर्स,
लीला हॉटेल, जेडब्ल्यू मॅरियेट, बेंगळुरू, टीमलीज सर्व्हिसेस इ. यांसारख्या काही कंपन्यांनी रोजगार मेळाव्यांमध्ये सहभाग घेतला होता.
5 वी-10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या आणि वरिष्ठ माध्यमिक किंवा आयटीआयचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या ,नोकरीच्या शोधात असलेल्या 18-35 वयोगटातील उमेदवारांना या ठिकाणी मोफत समुपदेशन प्रदान करण्यात आले.
***
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785297)
Visitor Counter : 241