संरक्षण मंत्रालय
डीआरडीओकडून जैव-शौचालये विकसित
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2021 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2021
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या जैव-शौचालयांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- हे ऍनेरोबिक (ऑक्सिजन रहित ) प्रक्रियेचा वापर करते ज्याद्वारे मानवी मलमूत्राचे जीवाणूंद्वारे विघटन केले जाते.
- जैव-शौचालय वापरण्यास सुलभ बनवले असून वेगवेगळ्या भौगोलिक-हवामानाच्या परिस्थितीत वापरण्यासाठी वेगवेगळी रचना विकसित केली आहे.
शेणाचा वापर जीवाणूंच्या संवर्धनासाठी केला जातो. जीवाणूंच्या गटात खालील चार प्रकारचे जीवाणू आहेत :
- हायड्रोलेस
- ऍसिडोजेनेस
- ऍसिटोजेनेस
- मेथोजीन्स
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने हे तंत्रज्ञान देशभरातील सुमारे 60 उद्योगांना हस्तांतरित केले आहे. या उद्योगांनी देशभरात बायो डायजेस्टर बसवले आहेत. 20 हून अधिक राज्यांमध्ये एकूण 16000 बायो-डायजेस्टर बसवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय रेल्वेच्या डब्यांमध्ये 2.5 लाखांहून अधिक बायो-डायजेस्टर बसवण्यात आले आहेत, जे दररोज 100 लाखाहून अधिक प्रवाशांची गरज पूर्ण करतात.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत मितेश रमेशभाई पटेल (बकाभाई) यांना लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1782691)
आगंतुक पटल : 209