सांस्कृतिक मंत्रालय
युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक यादीत ‘कोलकात्यातील दुर्गा पूजेचा ' केला समावेश
Posted On:
15 DEC 2021 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2021
एका महत्वाच्या घोषणेत, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी 2003 च्या संमेलनाच्या आंतर-सरकारी समितीने 13 ते 18 डिसेंबर 2020 या कालावधीत फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित 16 व्या संमेलनात मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक सूचीमध्ये 'कोलकात्यातील दुर्गा पूजा'चा समावेश केला आहे. उपेक्षित गटांना आणि व्यक्तींना तसेच महिलांना या घटकाचे रक्षण करण्यासाठी सहभागी करून घेण्याच्या दुर्गापूजेच्या उपक्रमाबद्दल समितीने दुर्गापूजेची प्रशंसा केली आहे.

केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपला समृद्ध वारसा, संस्कृती, आणि प्रथा यांच्या संगमाला मिळालेली ही मान्यता आहे आणि स्त्रीत्व आणि स्त्रीत्वाच्या भावनेचा उत्सव आहे.
दुर्गापूजा हा केवळ स्त्रीत्वाचा उत्सव नाही तर नृत्य, संगीत, कला, विधी , पाककला आणि सांस्कृतिक पैलूंची परिपूर्ण अभिव्यक्ती आहे. हा सण जात, पंथ आणि आर्थिक वर्गाच्या सीमा ओलांडतो आणि लोकांना त्याच्या उत्सवात सहभागी करतो.

कोलकाता येथील दुर्गापूजेच्या समावेशासह , भारताचे आता 14 अमूर्त सांस्कृतिक वारसा घटक आहेत ज्यांचा प्रतिष्ठित युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक सूचीमध्ये समावेश आहे.
अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे प्रथा, प्रतिनिधित्व, अभिव्यक्ती, ज्ञान, कौशल्ये – तसेच त्यांच्याशी संबंधित साधने, वस्तू, कलाकृती आणि सांस्कृतिक स्थाने समुदाय, गट आणि काही प्रकरणांमध्ये, व्यक्तींना सांस्कृतिक वारशाचा एक भाग म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781932)