रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ओदिशा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील बांधकाम, पुनर्वसन आणि उन्नतीकरण प्रकल्पांना दिली मंजुरी

Posted On: 15 DEC 2021 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2021

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी ओदिशातील  केसिंगा येथे राष्ट्रीय  महामार्ग -201 (सध्याचा एनएच -26) केएम 176 येथे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक RV-172 च्या ऐवजी,  भूसंपादनासह चौपदरी केसिंगा आरओबीच्या बांधकामाला  324.09 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे.  ट्विटच्या मालिकेत त्यांनी  सांगितले की आंध्र प्रदेशात पुनर्वसन आणि Km 170+700 ते 234+567 (Design Ch.) ते राष्ट्रीय महामार्ग  30 च्या दुपदरी उन्नतीकरणासाठी  388.70 कोटी रुपयांच्या  खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशात पुनर्वसन आणि अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम ( EPC ) पद्धतीने  राष्ट्रीय महामार्ग -42 च्या  मुलकालाचेरुवू ते मदनपल्ले या टप्प्याचे   दुपदरी वरून 2/4 पदरी   उन्नतीकरणाला   480.10 कोटी रुपये  खर्चासह मंजूरी देण्यात आली आहे.

मध्य प्रदेशात   2021-22 या आर्थिक वर्षासाठी सीआरआयएफ  योजनेअंतर्गत 600.13 किमी लांबीच्या 23 प्रकल्पांच्या विकासाला 1814.90 कोटी रुपयांच्या खर्चासह मंजुरी देण्यात आली आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1781858) Visitor Counter : 164


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi , Odia