आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 प्रतिबंधक लस निर्मिती क्षमतेविषयी अद्ययावत माहिती

Posted On: 14 DEC 2021 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2021

 

ChAdOx1 nCoV- 19 म्हणजेच कोविशिल्ड नावाच्या लसीची निर्मिती पुण्याच्या मे.सिरम इन्स्टिट्यूट या संस्थेकडून केली जाते तर हैदराबाद येथील मे.भारत बायोटेक ही कंपनी Whole Virion Inactivated प्रकारच्या म्हणजेच कोवॅक्सिन लसीची निर्मिती करते.

सिरम इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार या संस्थेची कोविशिल्ड लसीची उत्पादन क्षमता सुमारे 250 ते 275 दशलक्ष मात्रा प्रती महिना इतकी आहे.

तसेच भारत बायोटेक या कंपनीची विद्यमान कोवॅक्सिन लस उत्पादन क्षमता सुमारे 50 ते 60 दशलक्ष मात्रा प्रती महिना इतकी आहे. दोन्ही लस निर्मिती कंपन्यांनी त्यांच्या सध्याच्या लस उत्पादन क्षमतेच्या जवळजवळ 90% लस निर्मिती केली आहे.

याशिवाय, देशातील कोविड महामारीमुळे निर्माण झालेली लसीच्या मात्रांची तातडीची गरज लक्षात घेऊन औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा,1940 अंतर्गत जारी औषध आणि वैद्यकीय चाचण्यांचे नवीन नियम,2019 मधील तरतुदींनुसार, केंद्रीय औषध प्रमाणके नियंत्रण संघटनेने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या हेतूने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या सध्याच्या लसींखेरीज काही कोविड-19 प्रतिबंधक लसींना आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रित वापराची परवानगी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभा सदस्यांना लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1781331) Visitor Counter : 244