सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुमित कुमार- कारखान्यातील कामगार एमएसएमई-एनएसआयसी कर्जाच्या सहाय्याने झाला यशस्वी उद्योजक

Posted On: 14 DEC 2021 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2021

 

आग्रा येथील सुमित कुमार यांनी 2018 मध्ये "सुमित एंटरप्राइझ" नावाने आपल्या स्वप्नातील उद्योग उभारला. साफसफाईसाठी उपयोगी प्लास्टिक ब्रशचे उत्पादन यात केले जाते. अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या सुमितने कारखान्यातील मजुर ते उद्योजक अशी दैदीप्यमान कामगिरी केली.  

त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी माझा व्यवसाय 2 लाख रुपयांपासून सुरू केला.  पहिल्या 2 वर्षात, मी खूप काम घेऊ शकलो नाही, कारण माझ्या उत्पादनांची बाजारात मागणी वाढत होती पण माझ्याकडे निधीची कमतरता होती.

मला कर्जाची गरज होती पण दुर्दैवाने बँकेने माझी विनंती नाकारली.  त्यानंतर मी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) विभागात गेलो आणि त्यांच्या मदतीने मला 4,11,000 रुपयांचे कर्ज मंजूर झाले. सध्या माझी सहामाही उलाढाल अंदाजे 30 लाख रुपये आहे.  

एनएसआयसी एमएसएमई कर्जामुळे माझे परिवर्तन मजूर ते एका व्यवसायाचा मालक असे झाले आहे”.  एमएसएमई मंत्रालयाने त्यांना "आत्मनिर्भर" बनण्यास सक्षम केले. 

* * *

M.Chopade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1781298) Visitor Counter : 220