युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मिशन ऑलिम्पिक सेलचे सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू उज्वल यशासाठी लक्षवेधी बदल सुचवू शकतात: अनुराग ठाकूर
Posted On:
13 DEC 2021 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2021
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर म्हणाले की, मिशन ऑलिम्पिक सेल (MOC) या मंडळावर संस्थात्मक चौकट मजबूत करून भारतीय परिसंस्थेमध्ये अधिक सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करण्यात मदत करण्याची मोठी जबाबदारी आहे ,जेणेकरून 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत देश अधिक चांगली कामगिरी बजावू शकेल.
नवीन सदस्य म्हणून सात माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश करून पुनर्रचना करण्यात आलेल्या मिशन ऑलिम्पिक चमूला संबोधित करताना ठाकूर म्हणाले की टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेने काय साध्य केले आहे, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर यामुळे फायदा झाला आहे का तसेच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना उत्कृष्ट कामगिरीच्या दृष्टीने खेळाडूंची कामगिरी सुधारण्यास मदत झाली आहे का, हे तपासणे योग्य ठरेल.
ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यासारख्या मोठ्या स्पर्धांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आणि कामगिरीचे निष्पक्ष आणि न्याय्य मूल्यमापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला चांगले यश मिळावे यासाठी अनुभवी सदस्य व्यवस्थेत काही बदल सुचवू शकतात असे ते म्हणाले.
मिशन ऑलिम्पिक सेलचा एक भाग बनल्याबद्दल सदस्यांचे आभार मानताना, ते म्हणाले की त्यांना खात्री आहे की भारतीय खेळांमधील त्यांची कामगिरी आणि सहभागामुळे पुढल्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा लक्षात घेऊन ते मंत्रालयाला 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रूपरेषा आखण्यात मदत करतील .
ठाकूर म्हणाले की, सरकार खेळांवर पैसा खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही आणि क्रीडा क्षेत्रासाठीची तरतूद वाढवण्यास देखील मागेपुढे पाहणार नाही.
सात नवीन सदस्यांच्या समावेशांमुळे , मिशन ऑलिम्पिक सेलमधील माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या आठ झाली आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781120)
Visitor Counter : 171