माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एबीयू रोबोकॉन 2022 चे नवी दिल्लीत आयोजन
आंतरराष्ट्रीय अंतिम फेऱ्यांचे यजमानपद दूरदर्शनकडे
Posted On:
13 DEC 2021 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2021
तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल म्हणून दूरदर्शन पुढील वर्षी ऑगस्टमध्ये रोबोकॉन 2022 च्या आंतरराष्ट्रीय अंतिम फेऱ्यांचे आयोजन करणार आहे. आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनद्वारे रोबो स्पर्धा आयोजित केली जाते आणि विविध सदस्य देश दरवर्षी यजमानपद भूषवतात. 2022 मध्ये ही रोबो स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे.
एबीयू रोबोकॉन 2021 चे यजमानपद चीनने भूषवले होते, ज्यामध्ये 12 डिसेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निरमा विद्यापीठ आणि गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ (GTU), अहमदाबादचे संघ अंतिम फेरीत होते, ते भारताकडून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते.
प्रसार भारती मंडळाच्या सदस्य शायना एनसी त्यावेळी उपस्थित होत्या आणि त्यांनी अहमदाबादमधील निरमा विद्यापीठ आणि गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सहभागी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संबोधित केले होते. त्यांनी सर्व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना, विशेषत: मुलींना, पुढील वर्षी दूरदर्शनद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या रोबोकॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यावेळी केले होते.
डीडी रोबोकॉन 2022 च्या तयारीचा भाग म्हणून 15-16 डिसेंबर 2021 रोजी दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये डीडी रोबोकॉन 2022 ची ओळख करून दिली जाईल आणि यापूर्वीच्या रोबोकॉन स्पर्धांबाबत अभिप्राय आणि सूचना सामायिक केल्या जातील, तज्ञ त्यांची मते मांडतील, आणि परस्पर संवाद सत्रे देखील आयोजित केली जाणार आहेत.
प्रसार भारतीने डीडी रोबोकॉन 2022 शी संबंधित अधिक माहितीसाठी त्यांच्या संकेतस्थळावर एक पेज तयार केले आहे. तुम्ही या पेजला येथे भेट देऊ शकता - https://newsonair.com/robocon2022/
2002 मध्ये आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (ABU) द्वारे सुरू करण्यात आलेले एबीयू रोबोकॉन रोबोट्सना दिलेल्या कालावधीत एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे करते. एबीयू रोबोकॉननुसार, या स्पर्धेचा उद्देश 21 व्या शतकात आपापल्या देशांचे नेतृत्व करणार्या समान रूची असलेल्या तरुणांमध्ये मैत्री निर्माण करणे तसेच या प्रदेशात अभियांत्रिकी आणि प्रसारण तंत्रज्ञानाची प्रगती करण्यास मदत करणे हा आहे.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780919)
Visitor Counter : 274