संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 12 डिसेंबर 2021 रोजी इंडिया गेट येथे दोन दिवसीय 'स्वर्णिम विजय पर्व' चे उद्घाटन करणार
1971 च्या युद्धात वापरलेली शस्त्रे आणि उपकरणे तसेच प्रमुख युद्धांची झलक पाहता येईल
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2021 8:24PM by PIB Mumbai
1971 च्या युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयाला आणि भारत-बांग्लादेश मैत्रीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 12-13 डिसेंबर 2021 रोजी नवी दिल्लीतील इंडिया गेट येथे ‘स्वर्णिम विजय पर्व’ साजरा केला जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. 1971 च्या युद्धात वापरलेली प्रमुख शस्त्रे आणि उपकरणे तसेच प्रमुख युद्धांची माहिती यावेळी दाखवली जाणार आहे. उद्घाटनानंतर हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल.
13 डिसेंबर 2021 रोजी समारोप समारंभ आयोजित केला जाईल, ज्याला राजनाथ सिंह उपस्थित राहतील. बांगलादेशसह देशातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1780540)
आगंतुक पटल : 203