पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 10 DEC 2021 11:52AM by PIB Mumbai

 

सी.राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना  आदरांजली वाहिली आहे.

व्टिटरच्या माध्यमातून संदेशमालिकेमध्ये पंतप्रधान यांनी म्हटले आहे की,

‘‘आज सी.राजगोपालाचारी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान, त्यांच्याकडे असलेले प्रशासकीय कौशल्य आणि प्रखर बुद्धिमत्ता यामुळे त्यांचे स्मरण केले जाते.

राजाजींनी गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळचे छायाचित्र आणि त्यांना भारतरत्न किताब प्रदान करण्यात येणार असल्याच्या अधिसूचनेची प्रत पंतप्रधानांनी आपल्या व्टिटमध्ये सामायिक केले आहे. 

राजाजी यांच्या कामाचे बरेच प्रशंसक होते. त्यामध्ये सरदार पटेलांचा देखील सामावेश होता. भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सरदार पटेल यांनी  राजाजींना लिहिलेल्या पत्राचा काही अंश येथे सामायिक करण्‍यात  आला आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणतात

***

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1780046) Visitor Counter : 206