ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारकडून भरड धान्याची खरेदी, वाटप, वितरण आणि विनियोगासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी


ज्वारी आणि नाचणीचा आधीचा 3 महिन्यांचा कालावधी वाढवून अनुक्रमे 6 ते 7 महिने करण्यात आला

नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून भरड धान्याची खरेदी आणि वापर यात वाढ होईल

सार्वजनिक वितरण प्रणालीचे लाभार्थी असलेल्या दुर्लक्षित आणि गरीब शेतकऱ्यांना भरड धान्याची खरेदी आणि 1 रुपये प्रती किलो दराने वितरण करण्याचा लाभ होईल

Posted On: 09 DEC 2021 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2021

दिनांक 21.03.2014/26.12.2014 रोजी जारी भरड धान्य खरेदी, वाटप, वितरण तसेच विनियोग विषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार भरड धान्याच्या खरेदीचे नियमन केले जाते. या तत्वांतर्गत राज्य सरकारांना शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीला भरड धान्य खरेदी करण्याची परवानगी देण्यात येते. याकरिता राज्य सरकारांना भारतीय अन्न महामंडळाचा सल्ला घेऊन राज्यसरकारांनी तयार केलेल्या तपशीलवार खरेदी योजनेला केंद्र सरकारकडून केंद्रीय साठ्याचा विचार करून आधी मंजुरी घ्यावी लागते.

या मार्गदर्शक तत्वांनी राज्यांकडून होणाऱ्या भरड धान्यांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याचे मोठे कार्य केले आहे. आणि गेल्या 3 वर्षांच्या काळात भरड धान्यांच्या खरेदीत नोंदल्या जात असलेल्या वाढीने हे सिद्ध झाले आहे. मात्र, वेगवगळ्या धान्यांच्या साठवण कालावधीचा विचार न करता भरड धान्यांची खरेदी आणि वितरण यासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेला 3 महिन्यांचा कालावधी योग्य नसल्याचे लक्षात घेत काही राज्य सरकारांना या बाबतीत समस्या येत आहेत असे दिसून आले.

भरड धान्याची खरेदी आणि वितरण यामध्ये काही राज्य सरकारांना सतावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तसेच केंद्रीय साठ्याअंतर्गत भरड धान्यांच्या खरेदीत वाढ करण्यासाठी विविध भागधारकांशी चर्चा करण्यात आल्या.

या चर्चांतून निघालेल्या निष्पन्नाच्या आधारावर केंद्र सरकारने भरड धान्यांची खरेदी, वाटप, वितरण आणि विनियोग यासाठीच्या दिनांक 21.03.2014/26.12.2014 रोजी जारी झालेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा केल्या.

दिनांक 07.12.2021 रोजी जाहीर झालेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांतील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  1. ज्वारी आणि नाचणी या धान्यांचा वितरण कालावधी पूर्वीच्या 3 महिन्यांवरून वाढवून अनुक्रमे 6 आणि 7 महिने करण्यात आला. यामुळे आता राज्यांना उद्देशित सार्वजनिक वितरण प्रणाली किंवा इतर योजनेमध्ये या धान्यांचे वितरण करण्यास अधिक अवधी मिळणार असल्यामुळे या धान्यांची खरेदी आणि वापर यांच्यात वाढ होईल.
  2. खरेदी प्रक्रिया सुरु होण्याआधी ग्राहक राज्याने आगाऊ स्वरुपात नोंदवलेली मागणी पूर्ण करण्यासाठी जास्तीचे धान्य असणाऱ्या राज्यांकडून भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून आंतरराज्य धान्य वाहतुकीला मंजुरी देण्यात आली आहे.
  3. नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून होणारी भरड धान्य खरेदी आणि वापर यांच्यात वाढ होईल. ही पिके साधारणतः दुर्लक्षित आणि सिंचन रहित जमिनींवर उगवत असल्यामुळे, या पिकांची अधिक प्रमाणात लागवड, शाश्वत शेती आणि पीक फेरबदल यासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल. या धान्यांच्या खरेदीत वाढ झाल्यामुळे, या खरेदीपासून लाभ होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्यादेखील वाढेल.
  4. भरड धान्याची खरेदी आणि 1 रुपया किलो दराने विक्री याचा फायदा सार्वजनिक वितरण प्रणालीचे लाभार्थी देखील असलेल्या गरीब आणि दुर्लक्षित शेतकऱ्यांना होईल. गहू अथवा तांदुळासारख्या धान्यांच्या वाहतुकीचा खर्च वाचविण्यासाठी स्थानिक पातळीवरील वापरासाठी प्रदेश विशिष्ट भरड धान्ये वितरीत करता येतील.
  5. भरड धान्ये उच्च पोषणमुल्ये असणारी, आम्ल निर्माण न करणारी, ग्लुटेनमुक्त आणि पथ्यकर असतात. तसेच लहान मुले आणि युवा वर्गातील कुपोषणाच्या समस्येशी सुरु असलेला लढा बळकट करण्याबरोबरच, भरड धान्ये प्रतिकारशक्ती आणि निरोगी पणा वाढविण्यासाठी मदत करतात.

 

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1779835) Visitor Counter : 296