सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी

Posted On: 06 DEC 2021 3:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2021

अनिगमित अकृषिक उपक्रम आणि (जुलै 2015- जून 2016) वरील राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण अहवालाच्या (एनएसएस) 73 व्या फेरीनुसार, सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये कार्यरत व्यक्तींची अंदाजे संख्या सुमारे 11.10 कोटी आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एमओएसपीआय) याचे आयोजन केले होते.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) अंतर्गत 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20, 2020-21 आणि 2021-22 (2021-22) या वर्षात सूक्ष्म उद्योगांमध्ये अंदाजे रोजगार निर्मिती (व्यक्तींची संख्या)  15.11.2021 पर्यंत) अनुक्रमे 4.08 लाख, 3.87 लाख, 5.87 लाख, 5.33 लाख, 5.95 लाख आणि 2.90 लाख आहेत.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विविध योजना राबवत आहे.

देशातील एमएसएमई क्षेत्राला विशेषत: कोविड-19 महामारीमध्ये मदत करण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.  त्यापैकी काही आहेत:

i.एमएसएमईसाठी 20,000 कोटी रुपये गौण कर्ज.

ii.एमएसएमईसह व्यवसायासाठी 3 लाख कोटी रुपयांची अनुषंगिक मुक्त स्वयंचलित कर्जे.

iii.एमएसएमई निधीच्या माध्यमातून रुपये 50,000 कोटींचे समभाग निधीच्या प्रवाहात आणणे

iv.एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी नवीन सुधारित निकष.

v. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी ‘उद्यम नोंदणी’द्वारे एमएसएमईची नवीन नोंदणी.

vi.200 कोटी रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी जागतिक निविदा नाहीत. यामुळे एमएसएमईला मदत होईल.

केंद्रीय एमएसएमई मंत्री श्री नारायण राणे यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1778448) Visitor Counter : 230


Read this release in: English , Bengali , Tamil , Telugu