अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 3 कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल


ज्या करदात्यांनी अद्याप निर्धारण वर्ष  2021-22 साठी त्यांचे आयटीआर दाखल केलेले नाहीत त्यांना लवकरात लवकर दाखल करण्याचा सल्ला

Posted On: 05 DEC 2021 3:55PM by PIB Mumbai

 

प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलवर 3 डिसेंबर 2021 पर्यंत 3 कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत.विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत  मुदतवाढ  देण्यात आली असून ही तारीख जवळ येत असताना दररोज दाखल होणाऱ्या प्राप्तिकर विवरणपत्रांची संख्या 4 लाखांहून अधिक असून ती दिवसेंदिवस वाढत आहे.

टीडीएस म्हणजेच उत्पन्नावरील कर वजावट आणि कर देयकांची अचूकता पडताळण्यासाठी  आणि प्राप्तिकर विवरणपत्र  पूर्व-भरणा सुविधेचा  लाभ घेण्यासाठी करदात्यांनी  त्यांचा अर्ज 26एएस  आणि वार्षिक माहिती विवरण (एआयएस) हे ई-फायलिंग पोर्टलद्वारे पाहण्याचे कळकळीचे आवाहन प्राप्तिकर विभागाने करदात्यांना केले आहे. करदात्यांनी त्यांच्या बँक खातेपुस्तीका , व्याज प्रमाणपत्र, अर्ज  16 आणि इक्विटी/म्युच्युअल फंड इत्यादींच्या खरेदी आणि विक्रीच्या बाबतीत समभागांची खरेदी विक्री करणाऱ्या ब्रोकरेजकडून भांडवली नफ्याच्या विवरणासह  वार्षिक विवरण माहितीची  फेरपाडताळणी करणे  महत्वाचे आहे.

निर्धारण  वर्ष  2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्र  (आयटीआर ) दाखल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून दाखल झालेल्या प्राप्तिकर विवारणपत्रांची संख्या 3.03 कोटीवर पोहोचली आहे यापैकी 52% पेक्षा जास्त प्राप्तिकर विवरणपत्रे पोर्टलवर ऑनलाइन आयटीआर  अर्जाद्वारे   दाखल करण्यात आली  आणि उर्वरित प्राप्तिकर विवरणपत्रे ऑफलाइन सॉफ्टवेअर सुविधेच्या माध्यमातून  तयार केलेल्या आयटीआर निर्मित अर्जाचा उपयोग करून  सादर करण्यात आली

आयटीआर ची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि परतावा जारी करण्यासाठी, आधार ओटीपी  आणि इतर पद्धतींद्वारे ई-पडताळणीची प्रक्रिया विभागासाठी महत्त्वाची आहे. 2.69 कोटी विवरणपत्रांची  ई-पडताळणी करण्यात आली असून, त्यापैकी 2.28 कोटींहून अधिक विवरणपत्रांची पडताळणी ही आधार आधारित ओटीपीद्वारे करण्यात आली आहे, ही संख्या उत्साहवर्धक आहे .

नोव्हेंबरमध्ये, 1, 2 आणि 4 च्या पडताळणी केलेल्या आयटीआरपैकी  48% आयटीआरवर एकाच दिवशी प्रक्रिया करण्यात आली. पडताळणी  केलेल्या आयटीआरपैकी 2.11 कोटी पेक्षा जास्त आयटीआरवर प्रक्रिया करण्यात आली आहे आणि निर्धारण  वर्ष  2021-22 साठी 82.80 लाख पेक्षा जास्त परतावे जारी करण्यात आले आहेत. परतावा जमा होण्यात त्रुटी राहू नये यासाठी परताव्याची रक्कम जमा करण्यासाठी  निवडलेल्या बँकेशी  पॅन क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे.

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1778239) Visitor Counter : 439