उपराष्ट्रपती कार्यालय

सामान्य माणसाला सेवा प्रदान करण्यात सुधारणा व्हावी, यासाठी नागरी सेवांमध्ये नैतिक पुनरुत्थान आणण्याचे  उपराष्ट्रपतींचे आवाहन


भ्रष्टाचाराबाबत असहिष्णूता दाखवा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करा : उपराष्ट्रपती

Posted On: 05 DEC 2021 1:33PM by PIB Mumbai

 

देशातील नागरी सेवांमध्ये नैतिक सुधारणा करुन, सामान्य माणसापर्यंत नागरी सेवा प्रदान करण्याचा दर्जा उंचावत, विकासाचा लाभ लोकांपर्यंत पोहोचेल, हे सुनिश्चित करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज केले.

या संदर्भातत्यांनी भ्रष्टाचाराबद्दल असहिष्णूता दाखविण्याबाबत आणि प्रशासनाच्या सर्व स्तरांवर संपूर्ण पारदर्शकता आणण्याबाबत आपले उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याचे आवाहनही यावेळी केले. भ्रष्टाचार हा लोकशाहीचा गाभाच नष्ट करतो हे लक्षात घेऊन, त्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीसीए) चूक करणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात कठोर आणि वेळेवर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. सार्वजनिक सेवकांचा समावेश असलेल्या भ्रष्टाचाराच्या संबंधित अनेक प्रलंबित प्रकरणांचा,   प्राधान्याने आणि जलदगतीने पाठपुरावा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

त्याच वेळी, नायडू यांनी सतर्क केले, की प्रामाणिकपणे काम करणारे नागरी सेवकांना नाउमेद केले जात नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही,हे देखील आपण सुनिश्चित केले पाहिजे.  ``भ्रष्ट नागरी सेवकांवर कठोरपणे कारवाई करणे आवश्यक असतानासार्वजनिक हितासाठी धाडसी निर्णय घेण्याऱ्या अधिका-यांना आपण परावृत्त करू नये``, असेही ते पुढे म्हणाले.

झारखंडचे माजी राज्यपाल आणि भारत सरकारचे माजी कॅबिनेट सचिव प्रभात कुमार यांनी लिहिलेल्या पब्लिक सर्व्हिस एथिक्सया पुस्तकाचे आज उपराष्ट्रपती निवास येथे प्रकाशन करताना उपराष्ट्रपती बोलत होते. नायडू यांनी समाजात नैतिक मूल्यांची सामान्य घसरण होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आणि नैतिक भारतकिंवा 'एथिकल इंडिया' यासाठी व्यापक सामाजिक चळवळ सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

***

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1778236) Visitor Counter : 234