सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिन साजरा


दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

दिव्यांगजनांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी सरकार विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र प्रकल्प राबवण्याच्या मार्गावर

Posted On: 03 DEC 2021 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2021

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिन कार्यक्रमात राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद प्रमुख पाहुणे होते. त्यांनी व्यक्ती, संस्था, संघटना आणि राज्य/जिल्हा इत्यादींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री श्री रामदास आठवले, श्रीमती प्रतिमा भौमिक हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. वीरेंद्र कुमार यांनी राष्ट्रपतींनी दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी वेळोवेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले की, दिव्यांगजन हे मौल्यवान मनुष्यबळ  आहेत आणि पंतप्रधान राष्ट्रीय विकास कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींच्या प्रश्नांना प्राधान्य देतात. "सर्वसमावेशक विकास, सर्वांचा विकास आणि सर्वांचा आत्मविश्वास" हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. शासनाने दिव्यांग व्यक्तींचा अधिकार अधिनियम, 2016 लागू केला जो 19.04.2017 पासून लागू झाला आहे. या कायद्यात दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकऱ्यांमध्ये 4 टक्के आरक्षणाची तरतूद आहे. जानेवारी 2021 मध्ये, मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींसाठी योग्य अशी 3566 पदे निर्माण केली आहेत.

त्यांनी असेही सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना सार्वत्रिक सुविधा प्रदान करण्यासाठी सरकारने 03.12.2015 रोजी सुगम्य भारत अभियान (ऍक्सेसिबल इंडिया कॅम्पेन) सुरू केले जेणेकरून ते सन्मानाने अर्थपूर्ण जीवन जगू शकतील. या अभियानांतर्गत सार्वजनिक इमारती, वाहतूक व्यवस्था आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. बहुतेकांना भेडसावणाऱ्या सुविधेशी संबंधित समस्या लक्षात घेऊन, विभागाने शक्य तितक्या जलद आणि पद्धतशीरपणे त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोबाइल ॲप विकसित केले आहे.

श्रवणदोष असलेल्या व्यक्तींच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतात सांकेतिक भाषा निर्मितीसाठी  सरकारने भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे. ही संस्था, इतर कामांसह नियमितपणे  सांकेतिक भाषेतील शब्दकोश तयार करत आहे ज्यामध्ये आतापर्यंत 10,000 हून अधिक शब्द समाविष्ट झाले आहेत.

याशिवाय, दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याच्या उद्देशाने सरकार  एक विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र प्रकल्प राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 713 जिल्ह्यांमध्ये 64 लाखांहून अधिक विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र  तयार करण्यात आली  आहेत.

सरकार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे दिव्यांग क्रीडा केंद्राची स्थापना करत आहे, जे 2022 च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल.

त्यांनी विविध महत्वाकांक्षी  योजना/कार्यक्रमांतर्गत दिव्यांग  व्यक्ती सक्षमीकरण विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग  दिनानिमित्त म्हणजेच 3 डिसेंबर रोजी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा दिव्यांगजन (दिव्यांगजन) सक्षमीकरण विभाग दरवर्षी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व्यक्ती, संस्था, संघटना , राज्य/जिल्हा इत्यादींना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवतो.

वर्ष 2020 साठी दिव्यांग  व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे  राष्ट्रीय पुरस्कार खालील श्रेणींमध्ये देण्यात आले: -

I. सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी/स्वयंरोजगार व्यक्ती

II. सर्वोत्तम नियोक्ते आणि प्लेसमेंट अधिकारी आणि/किंवा एजन्सी;

III. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सर्वोत्कृष्ट व्यक्ती आणि संस्था;

IV. आदर्श व्यक्ती ;

V. दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुधारण्याच्या उद्देशाने  सर्वोत्कृष्ट उपयोजित संशोधन किंवा अभिनव उपक्रम किंवा उत्पादन

vi. दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळे मुक्त वातावरण निर्मितीमध्ये केलेले उत्कृष्ट कार्य;

VII. सर्वोत्तम पुनर्वसन सेवा प्रदान करणारा  जिल्हा;

Viii.  उत्कृष्ट सर्जनशील प्रौढ दिव्यांग व्यक्ती;

ix. सर्वोत्कृष्ट सर्जनशील दिव्यांग  बालक;

X. सर्वोत्तम ब्रेल प्रेस;

xi.  दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारे सर्वोत्कृष्ट राज्य

xii.  सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू

दिव्यांग व्यक्ती  सक्षमीकरण विभागाच्या सचिव अंजली भवरा आणि विभागाचे  वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

M.Chopade/V.Joshi/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1777838)
Read this release in: English , Hindi , Punjabi , Tamil