आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑक्सिजन संयंत्रांसह नवीन रुग्णालये

Posted On: 03 DEC 2021 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2021

सरकारने सुमारे 2000 मेट्रिक टन क्षमतेचे 1563 प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (PSA)ऑक्सिजन निर्मिती संयंत्र मंजूर केले असून ते  देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये पीएम केअर्स निधी अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापित आणि कार्यान्वित 1,225 पीएसए संयंत्रांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय, रेल्वे मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे 281 पीएसए संयंत्र उभारले जात आहेत आणि 57 पीएसए संयंत्र परदेशी अनुदान अंतर्गत  प्राप्त झाले आहेत. राज्यांना सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि खाजगी आरोग्य सुविधांमध्ये पीएसए संयंत्र बसवण्यास  सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वार्षिक एमबीबीएस प्रवेश नियमन , 2020 साठी किमान आवश्यकतांमध्ये सुधारणा करून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पीएसए संयंत्रे बसवणे अनिवार्य केले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1777670)