युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारने गेल्या पाच वर्षात पुरुष हॉकी संघावर 65 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला: श्री अनुराग ठाकूर

प्रविष्टि तिथि: 02 DEC 2021 7:12PM by PIB Mumbai

 

सरकारने गेल्या पाच वर्षांत पुरुष हॉकी संघावर 65 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. मागील पाच वर्षांमध्ये, म्हणजे 2016-17 ते  2020-21 या कालावधीत प्रशिक्षण शिबिरे, परदेशी स्पर्धा, देशांतर्गत स्पर्धा, प्रशिक्षकांचे पगार, उपकरणे इत्यादींसाठी वरिष्ठ हॉकी पुरुष संघासाठी 45.05 कोटी रुपये आणि कनिष्ठ हॉकी पुरुष संघासाठी 20.23 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

तसेच खेलो इंडिया योजनेअंतर्गत 2016-17 पासून हॉकीसाठी 20 पायाभूत सुविधा प्रकल्पांना 103.98 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

M.Chopade/V.Joshi/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1777384) आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil