आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाने प्रस्तावित आय एफ एस सी ए (विमा वेब एग्रीगेटर) नियमावली-2021 संदर्भातील सल्ला दस्तावेजाबाबत सूचना मागवल्या

Posted On: 02 DEC 2021 5:56PM by PIB Mumbai

 

भारतातील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्राशी संबधित आर्थिक उत्पादने, आर्थिक सेवा आणि आर्थिक संस्था यांच्या नियमनासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) ही एकछत्री नियामक संस्था स्थापन करण्यात आली आहे.

विमा मध्यस्थ कंपन्या या आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रांचा सर्वात महत्वाचा भाग आहेत . त्या आर्थिक बाजारपेठेस आवश्यक अशी परिसंस्था विकसित करून जागतिक स्तरावरील ग्राहकांना विमा सेवा पुरवतात.

विमा ब्रोकर्स, कॉर्पोरेट मध्यस्थ, तिसरा प्रशासक (थर्ड पार्टी अडमिनिस्ट्रेटर), सर्वेअर्स व लॉस असेसर्स यांच्यासारख्या मध्यस्थांची वा मध्यस्थ विमाकंपन्यांची नोंदणी व कामकाजासाठी नियामक चौकट म्हणून प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण  विमा मध्यस्थ (IFSCA)नियमावली, 2021याआधीच सूचीबद्ध केली आहे. आता आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्राकडून येणाऱ्या किरकोळ विमा व्यापाराच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत करत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाने इन्शुरन्स वेब अग्रीगेटर्सची नोंदणी व उपक्रम यांच्यासाठी नियामक चौकटीची गरज प्रस्तावित आहे.

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) नियमावली 2021 च्या मसूद्यासोबतच पात्रता निकष, नोंदणी प्रक्रिया आणि परवानगीपात्र उपक्रम यांचाही अंतर्भाव आहे.

त्यासोबतच, हा नियमावलीचा मसूदा, सल्लामसलतीचे दस्तावेज हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाच्या (IFSCA) https://ifsca.gov.in/PublicConsultation,invitingcomments/  या संकेतस्थळावर सामान्य नागरिक आणि संबधितांच्या सूचनांसाठी 20 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध आहेत.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777338) Visitor Counter : 235