नागरी उड्डाण मंत्रालय

आयसीएमआरकडून सार्स कोव्ह-2 च्या मॉलिक्युलर चाचणीसाठी नऊ प्रणालींना मान्यता


स्वखर्चाने रँडम सँपलिंग करण्याची धोकादायक श्रेणीत समाविष्ट नसलेल्या देशांमधील केवळ 2 टक्के प्रवाशांना अनुमती

Posted On: 01 DEC 2021 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2021

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 28 नोव्हेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी  जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना अल्गोरिदम ला अनुसरून या प्रवाशांना या सूचना योग्य प्रकारे लक्षात याव्यात आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरक्षित आणि कोणत्याही त्रासाविना  व्हावा यासाठी खाली वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे आणि ते सुरक्षित रहावेत या उद्देशाने ही पावले उचलण्यात येत आहेत हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे जेणेकरून त्यापश्चात कोणत्याही समस्या उद्भवू नयेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून होणाऱ्या आगमनांसंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने(MHFW) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना येथे पाहता येतील.

https://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinesforInternationalarrivalsdated30thNovember2021.pdf.

संबंधित देशांची यादी येथे उपलब्ध आहे-

https://www.mohfw.gov.in/pdf/ListofCountriestobereferredtoincontextofGuidelinesforinternationalarrivalsdated28thNovember2021updatedon30112021.pdf

अल्गोरिदम: आंतरराष्ट्रीय आगमनासाठी मार्गदर्शक सूचना येथे पाहता येतील

https://www.mohfw.gov.in/pdf/Algorithmforrevisedguidelinesforinternationalarrivals30thNovember2021.pdf.

Q 1. विमानतळांवर सार्स कोव्ह-2 च्या मॉलिक्युलर चाचणीविषयीच्या कोणत्या प्रकारच्या आरटीपीसीआर चाचण्यांना आयसीएमआरने मान्यता दिली आहे?

स्पष्टीकरण: आयसीएमआरने सार्स कोव्ह-2 च्या मॉलिक्युलर चाचणीविषयीच्या खालील प्रकारच्या प्रणालींना मान्यता दिली आहे.(या सर्व प्रणाली आरटीपीसीआरच्या बरोबरीच्या आहेत असे मानले जाते). ज्या प्रयोगशाळा या चाचण्या करतील त्या आयसीएमआर/एमओएचएफडब्लू यांनी सर्व बाधित प्रकरणांमध्ये जनुकीय क्रमनिर्धारणासाठी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतील.

  1. ओपन सिस्टम आरटीपीसीआर
  2. ट्रूनॅट
  3. जीनएक्स्पर्ट
  4. आरटीलॅम्प
  5. क्रिस्पआर/टाटाएमडी चेक/फेलुदा
  6. ऍबट आयडी नाऊ
  7. ऍक्युला बाय थर्मोफिशर
  8. रॅपिड आरटीपीसीआर
  9. कोविडएक्सडायरेक्टप्लेक्स

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमानतळांना प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिले आहेत.

Q 2. जोखीम असलेल्या देशांच्या यादीत नसलेल्या देशातून येणाऱ्या काही प्रवाशांची (एमओएचएफडब्लूच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार) आगमनानंतर झटपट चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत या प्रवाशांनी विमानतळावर थांबून राहण्याची गरज आहे का? विमानतळावर गर्दी होऊ नये म्हणून त्यांना विमानतळावरून बाहेर जाण्याची अनुमती असेल का?

स्पष्टीकरणः ज्या प्रवाशांची झटपट चाचणी( रॅन्डम सँपलिंग) होणार आहे ते आपले नमुने देऊन बाहेर जाऊ शकतात. मात्र, अशा प्रकारची सुविधा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केवळ 2 टक्के प्रवाशांसाठी मर्यादित आहे आणि ती स्वखर्चाने करावी लागेल. विमान कंपन्या/ विमानतळ यांनी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांशी रँडम सँप्लिंगसाठी प्रवासी निवडण्यासंदर्भात समन्वय राखावा.

Q 3.- जर अशा देशातून येणारे प्रवासी (जोखीम नसलेल्या देशातून) जोखीम असलेल्या देशांच्या विमानतळांच्या परिसरात थांबून आले असतील तर त्यांना आगमनानंतर स्वयं घोषणा अर्जाच्या आधारे चाचण्यांमधून वगळण्यात येईल का?

स्पष्टीकरणः जोखीम नसलेल्या देशातून येणारे प्रवासी, जोखीम असलेल्या देशांच्या विमानतळांवर केवळ उतरले असतील(इमिग्रेशन मधून बाहेर न पडता) आणि नंतर दुसऱ्या विमानाने प्रवास करून भारतात आले असतील त्यांना आगमन पश्चात चाचण्यांमधून वगळले जाईल. मात्र ज्या प्रवाशाने गेल्या 14 दिवसात जोखीम असलेल्या कोणत्याही देशात प्रवास केला असेल तर त्याला/ तिला आगमनपश्चात चाचणी करून घ्यावी लागेल आणि या  प्रवाशावर इतर सर्व निर्बंध लागू होतील.

 Q 4.- आगमनपश्चात कोविड-19 चाचणी  आगमनाच्या स्थळी  स्वखर्चाने आहे. अशा प्रवाशांना त्यांच्या चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत विमानतळ सोडण्यापूर्वी किंवा पुढच्या प्रवासासाठी दुसरे विमान पकडण्यापूर्वी आगमनाच्या विमानतळावर थांबावे लागेल.

स्पष्टीकरणः याचा अर्थ असा आहे की निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर ते प्रवासी त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पुढचे विमान पकडू शकतात.

Q 5.- चाचण्यांचे अहवाल मिळाल्यानंतर प्रवाशांना टप्प्याटप्प्याने बाहेर पडता येईल का जेणेकरून विशिष्ट विमानाने आलेल्या प्रत्येक प्रवाशाचा अहवाल येईपर्यंत सर्वांनीच विमानतळावर थांबून राहण्याची गरज उरणार नाही?

स्पष्टीकरणः एकदा निगेटिव्ह अहवाल मिळाल्यानंतर संबंधित प्रवासी विमानतळावरून बाहेर जाऊ शकतो किंवा पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या विमानाने प्रवास सुरू करू शकतो. त्याला/ तिला सर्व सहप्रवाशांचे अहवाल येईपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776923) Visitor Counter : 271