आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सरकार उद्‌भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न


'जोखीम असलेल्या' देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर जीनोमिक देखरेख ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी विमानतळ आणि बंदरांवर सतर्कता बाळगण्याची केली सूचना

एपीएचओ आणि पीएचओना विमानतळ / बंदरांवर चाचणी प्रोटोकॉलचे कठोर पालन करण्याच्या दिल्या सूचना

Posted On: 28 NOV 2021 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021

 

केंद्र सरकार ‘संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’ या दृष्टिकोनासह जागतिक महामारीविरुद्ध लढ्याचे नेतृत्व करत आहे. कोविड व्यवस्थापनासाठी संबंधितांना बळकट करण्याचा प्रयत्न म्हणून, सरकार राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांना आणि विविध नोडल संस्थांना सार्वजनिक आरोग्य प्रतिसादांवर लक्ष केंद्रित करण्याचा सातत्याने सल्ला देत आहे . कोविड-19 (B.1.1529) चा नवीन ओमिक्रॉन प्रकार उदयाला आल्यामुळे अशा जोखीम-आधारित दृष्टिकोनावर भर दिला जात आहे ज्याला जागतिक आरोग्य संघटनेने "चिंताजनक " म्हणून वर्गीकृत केले आहे.

उद्‌भवलेली परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य उपायांच्या बाबतीत भारताच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी काल एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी 25 आणि 27 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांच्या पत्रांद्वारे चाचणी, देखरेख ठेवणे, हॉटस्पॉट्सचे निरीक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा वाढवणे, जीनोम सिक्वेन्सिंग आणि जनजागृती वाढवण्याबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या होत्या.

आंतरराष्‍ट्रीय प्रवासी आणि त्‍यांचे संपर्क तपासण्‍याच्‍या त्रि-स्तरीय देखरेखीच्या धोरणाची कठोर अंमलबजावणी आणि कठोर देखरेख आणि RT-PCR पॉझिटिव्ह नमुने नियुक्त INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेकडे (SLIGS) वेळेवर पाठवणे तसेच कोविड-19 हॉटस्पॉट्सच्या वाढीव चाचण्या आणि देखरेखीवर भर देण्यात आला.

या देशांतून प्रवास करणारे सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी जे भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या जोखमीच्या श्रेणीचा भाग आहेत आणि आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सूचित केलेल्या इतर सर्व 'जोखीम असलेल्या' देशांचा समावेश करणे आवश्यक असून दिनांक 11 नोव्हेंबर 2021,च्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कठोर तपासणी आणि चाचणीच्या अधीन आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या संपर्कांचाही बारकाईने पाठपुरावा केला जाईल आणि त्यांची चाचणी केली जाईल.

या संदर्भात, आज गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली ज्यामध्ये ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर एकूण जागतिक परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला. या बैठकीला डॉ. व्ही के पॉल, सदस्य (आरोग्य), नीती  आयोग, डॉ. विजय राघवन, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि आरोग्य, नागरी विमान वाहतूक आणि इतर मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह विविध तज्ञ उपस्थित होते.

विविध प्रतिबंधात्मक उपाय आणि ते  आणखी मजबूत करण्यावर  चर्चा करण्यात आली. येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी आणि देखरेख  ठेवण्यावरील मानक कार्यप्रणालीचा आढावा आणि अद्ययावतीकरण, विशेषत: ‘जोखीम’ श्रेणीत ओळखल्या गेलेल्या देशांमधील प्रवाशांसदर्भात देखील चर्चा करण्यात आली. INSACOG नेटवर्कद्वारे व्हेरियंटवर जीनोमिक देखरेख  ठेवणे  तीव्र करण्यावर  लक्ष केंद्रित करण्यावर सहमती झाली.

विमानतळ/बंदरांवर चाचणी प्रोटोकॉलच्या कठोर देखरेखीसाठी विमानतळ आरोग्य अधिकारी (APHOs) आणि बंदर आरोग्य अधिकारी ( PHOs) यांना जागरूक करणे आवश्यक आहे.

उद्‌भवलेल्या जागतिक परिस्थितीनुसार, व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत  तारखेच्या निर्णयाचा आढावा घेतला जाईल. देशातील  परिस्थितीवर बारीक नलक्ष ठेवले जाईल.

कोविड-19 संबंधित तांत्रिक समस्या, मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांबाबत विश्वासार्ह आणि ताज्या माहितीसाठी कृपया नियमितपणे भेट द्या: https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक शंका technicalquery.covid19[at]gov[dot]in वर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva पाठवता येतील.

कोविड-19 बाबत काही शंका असल्यास, कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल-फ्री). कोविड-19 बाबत  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन नंबरची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर देखील उपलब्ध आहे.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775946) Visitor Counter : 212