इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय साजरा करणार ‘स्वातंत्र्याचा डिजिटल अमृतमहोत्सव ; 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या विशेष सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 28 NOV 2021 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021

देश सध्या, स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आणि हा भारतासाठी अमृतकाळ आहे. तसेच, भारताला आपले सामर्थ्य समजून घेत, इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला येण्याचीही हीच योग्य वेळ आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  आत्मनिर्भर भारत अभियानाविषयीचे आपले दूरदर्शी धोरण आणि त्यातून नव्या भारताची उभारणी यावर सातत्याने मार्गदर्शन करत असतात.

या अनुषंगाने, अमृत महोत्सवाचे औचित्य साधत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ‘आझादी का डिजिटल महोत्सव’असा विशेष साप्ताहिक कार्यक्रम साजरा करणार आहे. या आठवड्यात, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने डिजिटल क्षेत्रात केलेल्या विविध उपलब्धी आणि कामगिरी लोकांसमोर आणली जाईल. तसेच, भविष्यासाठीचा आराखडाही तयार केला जाईल.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रातील अर्थव्यवस्थावर झालेला परिणाम, तसेच सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात, डिजिटल भारताची बदलत जाणारी ओळख, यावर विशेष भर देत , डिजिटल क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी चालना देण्याच्या उद्देशाने या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे आणि  संपर्कयंत्रणा मंत्री अश्विनी वैष्णव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, यांच्यासह अनेक विविध केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी, आणि उद्योग क्षेत्रातील धुरीण या कार्यक्रमांना उपस्थित असतील.

भारताला एक डिजितली सक्षम समाज म्हणून परिवर्तीत करण्यासाठी, ज्ञान-आधारित अर्थव्यवस्था आणि संपर्क यंत्रणा निर्माण करणे हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कार्याचे मुख्य स्वरुप आहे. याच उद्देशावर आधारित विविध उपक्रम/ कार्यक्रम येत्या 29  नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून सुरु होणार आहेत. डिजिटल भारताकडे होणारी देशाची वाटचाल या कार्यक्रमातून दाखवली जाईल.

या साप्ताहिक कार्यक्रमांसाठी मुख्य संकल्पना,  ‘डिजिटल इंडिया’,इलक्ट्रॉनिक सिस्टिम डिझाईन आणि उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणेसामाईक सेवा केंद्रांना सक्षम करणे, स्वदेशी कॉम्प्युट डिझाईन मध्ये भारताला सक्षम करणे, माय गोंव आणि डिजिटल पेमेंट उत्सववर अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढवणे, अशा निश्चित करण्यात आल्या आहेत.  या साप्ताहिक कार्यक्रमात विविध विषयांवर पूर्ण सत्रे, चर्चासत्रे आणि प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आझादी का डिजिटल महोत्सव सप्ताहाची सांगता बँकर्स आणि फीनटेक (वित्तीय तंत्रज्ञान) क्षेत्राविशेष कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करुन होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रंजीव चंद्रशेखर या कार्यक्रमाला संबोधित करतील.

या संपूर्ण सप्ताहात विविध ठिकाणी असणाऱ्या प्रदर्शनामध्ये डिजिटल इंडियाचे उपक्रम, युवकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा जबाबदारीने वापर  या विषयावर आधारित शालेय मुलांनी केलेले प्रकल्प, सामाईक सेवा केंद्रासाठीचे प्रकल्प, पेमेंट सोल्यूशन, स्टार्ट अप कंपन्याचे अभिनव प्रयोग- यात रोबो, ड्रोन, ऑटोनॉमस बॉटस . एआर/वीआर सोल्यूशन्स आणि इतर अनेक उपक्रम असतील.

सर्व कार्यक्रमांची सविस्तर माहिती https://amritmahotsav.negd.in/ या लिंकवर उपलब्ध आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रसारण डिजिटल इंडियाचे अधिकृत यू ट्यूब चॅनेलवरुन केले जाईल. त्याची लिंक : https://www.youtube.com/DigitalIndiaofficial/

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775837) Visitor Counter : 231