पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची मॉडेल रिटेल आउटलेट योजना सुरु

Posted On: 27 NOV 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी मॉडेल रिटेल आउटलेट योजना आणि Darpan@petrolpump नावाचा डिजिटल ग्राहक प्रतिसाद कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. दररोज 6 कोटी ग्राहकांना सेवा पुरवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील तीन तेल कंपन्या त्यांच्या नेटवर्कवर सेवा मानके आणि सुविधा वाढवण्यासाठी मॉडेल रिटेल आउटलेट सुरू करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.

या उपक्रमाचे उद्‌घाटन  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि सचिव तरुण कपूर हे यावेळी उपस्थित होते.

झपाट्याने बदलणाऱ्या  ग्राहक  सवयी आणि रिटेल आउटलेटमध्ये ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याच्या दृष्टीने तेल विपणन कंपन्यांनी या उपक्रमांची सुरुवात केली आहे.

या योजनेमध्ये देशातील 70,000 पेक्षा जास्त रिटेल आउटलेट्सवर 5 स्तरीय मूल्यमापन प्रक्रिया समाविष्ट आहे.  यात स्वच्छ स्वच्छतागृहे, ग्राहक केंद्रित नाविन्यपूर्ण सुविधा पुरवल्या जातील. रिटेल आउटलेट्स डिजिटल इंडियाच्या अत्यावश्यकतेच्या अनुषंगाने विक्रीची कामगिरी, देण्यात येणाऱ्या सुविधा आणि विक्री करताना डिजिटल व्यवहारांची टक्केवारी यावर आधारित 4 श्रेणींमध्ये विभागले आहेत .

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून श्रेष्ठ आणि उत्तम पुरस्कार आणि संबंधित तेल कंपन्यांकडून राज्य प्रथम पुरस्कार प्रदान केले जातील. डिजिटल ग्राहक प्रतिसाद कार्यक्रम darpan@petrolpump हा एक अनोखा, वास्तविक कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला असून ग्राहकांना त्यांचे मौल्यवान अभिप्राय देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल ज्यामुळे रिटेल आउटलेट्सवर सेवा उंचावण्यास खूप मदत होईल.

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775647) Visitor Counter : 252