गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सत्राला आणि सर्वसाधारण बैठकीला संबोधित केले
भाषणाची संकल्पना होती- 'भारत @75 - ईशान्य भारताला सक्षम बनवणे '
Posted On:
25 NOV 2021 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) च्या वार्षिक सत्र आणि सर्वसाधारण बैठकीला संबोधित केले. भाषणाची संकल्पना होती- 'भारत @75 - ईशान्य भारताला सक्षम बनवणे ' .

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की 2014 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले तेव्हा त्यांनी भारताच्या विकासाबरोबरच ईशान्य प्रदेशच्या विकासासाठी आपला दृष्टीकोन सामायिक केला. सर्वसमावेशक, सर्वव्यापी आणि संतुलित विकास झाल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले होते. स्वातंत्र्यानंतर पश्चिम आणि दक्षिण भारतात अधिक विकास झाला, परंतु 70 वर्षांची पार्श्वभूमी पाहिली तर पूर्व भारत मागे पडल्याचे दिसून येते असे शाह म्हणाले . आम्ही सत्तेवर आल्यावर पूर्व भारताच्या विकासावर लक्ष केंद्रित करू आणि देशाच्या विकासाला उर्वरित भारताच्या विकासाच्या बरोबरीने आणून त्याला देशाच्या विकासात हातभार लावायला लावू असे पंतप्रधान म्हणाले होते. आणि मला याचा आनंद आहे, की गेल्या 7 वर्षांत पूर्वेकडील बदलाचे वारे या परिसरात दिसायला लागले. , जेव्हा आपण पूर्व भारताच्या विकासाबद्दल बोलतो तेव्हा ईशान्य प्रदेशाच्या विकासाशिवाय त्याची कल्पनाही करता येत नाही असे ते म्हणाले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आहे. आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आहोत आणि जे स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करतील त्यांच्यासाठी आपण मार्ग तयार करायचा आहे. देशाचा पूर्ण विकास करायचा असेल तर देशाच्या प्रत्येक भागाचा समान विकास व्हायला हवा. ते म्हणाले की, ईशान्य प्रदेशात भांडवल गुंतवणुकीसाठी ज्या प्रकारचे वातावरण निर्माण करणे आवश्यक होते , ते आम्ही 7 वर्षांत तयार केले. आयसीसी आणि सदस्यांना आवाहन करताना ते म्हणाले की त्यांनी ईशान्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे, तिथे झालेला बदल जाणून घेऊन गुंतवणूक करावी. ईशान्येत गुंतवणूक करण्याची, त्याला सशक्त बनवण्याची, देशाच्या इतर भागांशी जोडण्याची आणि त्याच्या विकासाला चालना देण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न साकार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण सर्वांनी ईशान्येच्या विकासात योगदान देऊ असा संकल्प करायला हवा.

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775163)