भारतीय निवडणूक आयोग

‘महिला, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांचा निवडणूकीतील सहभाग वाढवणे: सर्वोत्तम पद्धती आणि नवीन उपक्रमांची देवाणघेवाण’ या विषयावर भारतीय निवडणूक आयोग करणार वेबिनारचे आयोजन

Posted On: 25 NOV 2021 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

जागतिक निवडणूक आयोगांची संघटना (असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज ए-डब्ल्यूईबी) ही जगभरातील निवडणूक  व्यवस्थापन संस्थांची (ईएमबी) सर्वात मोठी संघटना आहे. यात 117 ईएमबी हे सदस्य आणि सहयोगी सदस्य म्हणून 16 प्रादेशिक संघटना/संस्था आहेत.  भारतीय निवडणूक आयोग 3 सप्टेंबर 2019 पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी ए-डब्ल्यूईबीचा अध्यक्ष आहे.  ए-डब्ल्यूईबीच्या अध्यक्षपदाची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, भारतीय निवडणूक आयोगाने, उदया म्हणजेच  26 नोव्हेंबर 2021 रोजी 'महिला, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांचा निवडणूकीतील सहभाग वाढवणे: सर्वोत्तम पद्धती आणि नवीन उपक्रमांची देवाणघेवाण ' या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे.

भारतासह, बांगलादेश, भूतान, कंबोडिया, इथिओपिया, फिजी, जॉर्जिया,   कझाकस्तान, कोरिया प्रजासत्ताक, लायबेरियामलावी, मॉरिशस, मंगोलिया, फिलीपिन्स, रोमानिया, रशिया, साओ टोम आणि प्रिंसिपे, सोलोमन द्वीपसमूह, आफ्रिका, श्रीलंका, सुरीनाम, तैवान, उझबेकिस्तान, येमेन आणि झांबिया या जगातील 24 देशांतील जवळपास शंभर प्रतिनिधी आणि 4 आंतरराष्ट्रीय संस्था - आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल) आयडीईए, आंतरराष्ट्रीय निवडणूक प्रणाली संस्था (इंटरनॅशनल फाउंडेशन ऑफ इलेक्टोरल सिस्टम्स, आयएफईएस), जागतिक निवडणूक मंडळ संघटना (असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज, ए-डब्ल्यूईबी) आणि युरोपीय निवडणूक केन्द्र (युरोपियन सेंटर फॉर इलेक्शन) या  वेबिनार मध्ये सहभागी होणार आहेत.

उझबेकिस्तानचे राजदूत आणि फिजी, मालदीव, मॉरिशस येथील उच्चायुक्तांसह जवळपास 20 मुत्सद्दी देखील वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत.

महिला, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक मतदार यांचा निवडणूकीतील सहभाग वाढविण्यासाठी सहभागी ईएमबी आणि संस्थांद्वारे त्यांनी स्वीकारलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि उपाययोजना यावर वेबिनारमधे सादरीकरणे केली जातील.

पहिल्या सत्रात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि मॉरिशसचे निवडणूक आयुक्त महामहीम मोहम्मद इरफान अब्दुल रहमान, आणि बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त  के.एम. नुरुल हुदा सह-अध्यक्षपद भूषवतील.

ए-डब्ल्यूईबी इंडिया जर्नल ऑफ इलेक्शन्स याचा ऑक्टोबर 2021चा अंक; ऑक्टोबर 2021 चा ‘व्हॉइस इंटरनॅशनल’ मासिकाचा अंक आणि ‘निवडणुकांमध्ये महिला, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांचा सहभाग’ या विषयावर प्रकाशन ही तीन प्रकाशने वेबिनारमध्ये प्रकाशित केली जातील.

तसेच,वेबिनारमध्ये महिला, पीडब्ल्यूडी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा आणि सहभागावरील आंतरराष्ट्रीय चित्रफितीच्या सादरीकरणाचे अनावरण केले जाईल.

 

R.Aghor/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774999) Visitor Counter : 167