ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
' स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सविनिमित भारतीय मानक संस्थेने ‘मेक इन इंडिया – खेळण्यांसोबत सुरक्षित खेळणे’ या विषयावर वेबिनारचे केले आयोजन
विविध वयोगटातील मुलांमधे शिकण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी खेळण्यांच्या संज्ञानात्मक मूल्यामध्ये संरचना (डिझाइन) आणि खेळ यांची भूमिका वक्त्यांनी केली स्पष्ट
खेळण्यांच्या सुरक्षिततेचे मुद्दे आणि खेळण्यांची चाचणी यावरही झाली चर्चा
भारतीय मानक संस्थेद्वारे खेळण्यांचे मानकीकरण उपक्रम तसेच खेळणी क्षेत्रातील नियमनाचे महत्त्व यावर करण्यात आली चर्चा
Posted On:
25 NOV 2021 9:36AM by PIB Mumbai
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा प्रगतीशील भारताच्या 75 वर्षांचा आणि इथल्या लोकांच्या संस्कृतीचा, कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी तसेच त्यांचे स्मरण करण्याचा भारत सरकारचा एक उपक्रम आहे.
भारतीय मानक संस्था (बीआयएस) देखील विविध विषयांवर चर्चासत्रे/वेबिनार आयोजित करून @75 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भाग घेत आहे.’
चर्चासत्रे/वेबिनारच्या या मालिकेत, भारतीय मानक संस्थेने 23 नोव्हेंबर 2021 रोजी ‘मेक इन इंडिया – खेळण्यांसोबत सुरक्षित खेळणे’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते.
या वेबिनारमध्ये खेळणी उत्पादक, एफआयसीसीआय, टीएआयटीएमए, टीएआय एनआयडी इत्यादी उद्योग संघटना तसेच शैक्षणिक संस्था डब्लू आयटीटीवाय इंटरनॅशनल स्कूल, सीएसआयआर-आयआयटीआर, चाचणी प्रयोगशाळा टीयूव्ही, आयआरएमए, एसजीएस आणि इतर यांसारख्या संस्था सहभागी झाल्या होत्या.
खेळणी विकसित करण्यामध्ये संरचना (डिझाइन) आणि खेळण्याची भूमिका, विविध वयोगटातील मुलांमधे शिकण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी खेळण्यांचे संज्ञानात्मक मूल्य, खेळण्यांचे सुरक्षिततेचे पैलू आणि खेळण्यांची चाचणी याबद्दल वक्त्यांनी माहिती दिली.
भारतीय मानक संस्थेद्वारे खेळण्यांचे मानकीकरण उपक्रम, खेळणी क्षेत्रातील नियमनाचे महत्त्व, मेक इन इंडिया खेळण्यांच्या निर्यातीची व्याप्ती, संधी आणि खेळणी उद्योगाच्या क्षेत्रातील अलीकडील प्रगती/नवीन शोधांवर देखील वेबिनारमध्ये चर्चा झाली.
********
RA/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774950)
Visitor Counter : 240