मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
प्रतिजैविके प्रतिरोधाशी लढण्याच्या राष्ट्रीय कृती योजनेबाबत ,पशुसंवर्धनआणि दुग्धव्यवसाय विभागाद्वारे,हितसंबंधियांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
जागतिक प्रतिजैविके जागरूकता सप्ताहानिमित्ताने "प्रतिजैविके प्रतिरोधाशी लढण्याच्या राष्ट्रीय कृती योजनेचे धोरणात्मक प्राधान्य" या विषयावर चर्चा करण्यात आली
‘स्वच्छते पासून पवित्रतेकडे’ हे ध्येय गाठण्यासाठी सर्व स्तरावर सर्वांगीण पशु आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रामाणिक आणि समन्वयीत प्रयत्नांची गरज - परषोत्तम रुपाला
Posted On:
23 NOV 2021 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021
अमेरिकेच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मदतीने, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने 'अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्स' म्हणजेच प्रतिजैविके प्रतिरोधाशी लढण्याच्या राष्ट्रीय कृती योजनेवर हितसंबंधियांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी या कर्यशाळेच्या उद्घाटन सत्रात भाषण केले, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ लोगानाथन मुरुगन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी, उपमन्यु बसू यावेळी उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात प्रतिजैविके प्रतिरोध याविषयी जागरूकता वाढविण्यावर चर्चा करण्यात आली.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774750)
Visitor Counter : 199