अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जम्मूमध्ये 145 लाभार्थ्यांना एकूण 306 कोटी रुपयांच्या कर्ज मंजुरी पत्रांचे केले वाटप


उद्योजिका, आतिथ्य आणि पर्यटन व टूर उद्योगांसाठी अनेक नव्या योजनांचा अर्थ मंत्र्यांकडून आरंभ

Posted On: 23 NOV 2021 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये एका कार्यक्रमात145 लाभार्थ्यांना विविध बँकांच्या तीनशे सहा कोटी रुपयांच्या कर्ज मंजुरीची पत्रे सुपूर्द केली. यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्माण कार्यक्रम, मुद्रा योजना, स्वयंसहाय्य गट, संयुक्त देय गट अशा अनेक कर्जांसंबंधी योजनांसाठीच्या कर्ज मंजुरी पत्रांचाही समावेश होता.

अर्थमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरसाठी अनेक नव्या योजनांची तसेच उपक्रमांची घोषणा या वेळी केली. यामध्ये जम्मू काश्मीर बँकेच्या तेजस्विनी आणि हौसला या योजना, पंजाब नॅशनल बँकेच्या शिखर आणि शिकारा योजना तसेच 200कोटी रुपयांची सिडबी क्लस्टर विकास योजना अशा योजनांचा समावेश आहे.

निर्मला सीतारमण यांनी शोपियन आणि बारामुल्ला येथील ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे उद्‌घाटन केले, त्याचप्रमाणे सलाल, बग्गा, व बुधान या रियासी जिल्ह्यातील जम्मू-काश्मीर बँकेच्या शाखांचे उद्‌घाटनही केले.

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी , ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी या कार्यक्रमाअंतर्गत नाबार्ड 787 कोटी ते Rs.1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल अशी घोषणा 2020-21 या वर्षासाठी केली गेली होती. यामुळे वेगवान आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण पायाभूत सुविधांच्या उभारणीला सहकार्य मिळेल.

आर्थिक विकासाला अजून वेग देण्यासाठी बँका जम्मू कश्मीरमध्ये लघु कर्जांची गेल्या वर्षीची 14,735 कोटी रुपयांची किमान मर्यादा वाढवून ती 16,000 कोटी रुपयांपर्यंत नेणार आहेत.

 

G.Chippalkatti /V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774405) Visitor Counter : 187


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu