पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकार धोरणात्मक पेट्रोलियम साठयांमधून कच्चे तेल बाजारात आणणार

Posted On: 23 NOV 2021 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

द्रवरूप हायड्रोकार्बन ची किंमत कायम वाजवी, जबाबदार  आणि बाजारातील घडामोडींशी सुसंगत असली पाहिजे या तत्वावर भारताचा ठाम विश्वास आहे. तेल उत्पादक देशांकडून मागणीच्या तुलनेत तेलाचा पुरवठा कृत्रिमरित्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल भारताने  वारंवार चिंता व्यक्त केली आहे. या देशांच्या अशा धोरणांमुळे तेलाच्या किमती वाढतात आणि त्याचे पुढे सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम होतात.

भारताने आपल्या धोरणात्मक पेट्रोलियम साठयांमधून पांच दशलक्ष पिंप कच्चे तेल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.एकीकडे जागतिक ऊर्जा वापरकर्ते देश, ज्यात अमेरिका, चीन, जपान आणि कोरिया अशा देशांचाही समावेश आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु ठेवत, दुसरीकडे समांतर पातळीवर हे कच्चे तेल बाजारात आणले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशांतर्गत वाढत असलेल्या पेट्रोलियम इंधन/डिझेलच्या वाढत्या किमतीवर लक्ष ठेवून आहे. महागाईचा वाढता दबाव नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकारने, 3 नोव्हेंबर 2021 रोजी  पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी शुल्क अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांनी कमी केले होते. त्यानंतर अनेक राज्य सरकारांनी त्यावरील मूल्यवर्धित कर कमी केला. सरकारवर सध्या आर्थिक ताण असतांनाही नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हे कठीण निर्णय घेतले.

 

G.Chippalkatti /R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1774344) Visitor Counter : 311