श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सर्वांगीण प्रयत्नांमुळे ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीने प्राप्त केले मोठे यश
8.4 कोटींहून अधिक असंघटित नोंदणीकृत कामगारांपैकी अर्ध्याहून अधिक कामगारांचा मुख्य व्यवसाय शेती
'18-40' वयोगटातील कामगारांचा वाटा सर्वाधिक आहे, त्यानंतरचा हिस्सा'40-50' वयोगटातील कामगारांचा
Posted On:
21 NOV 2021 11:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021
ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी सुरू झाल्यापासून 12 आठवड्यांपासून ती सातत्याने वाढत आहे (खालील आकृती पहा). नोंदणी सुरू झाल्यापासून संपलेल्या 12 आठवड्यांत ,दिनांक 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत, सुमारे 8,43,89,193 असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे, काल एकूण 13,10,758 कामगारांनी नोंदणी केली.
केंद्रीय श्रम आणि रोजगार, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री भूपेंद्र यादव यांनी दिलेल्या एकात्मिक आदेश, नियंत्रण, नियमित दिशानिर्देश आणि काटेकोर देखरेख तसेच मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकारांचे सहकार्य ,केंद्रीय कामगार संघटनांचे नेते आणि त्यांचे राज्य सहकारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याने ई-श्रम पोर्टलवर ही नोंदणी होण्यात आलेले यश हे लक्षणीय आहे.
( श्री भूपेंद्र यादव - माननीय कामगार आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री ई-श्रम नोंदणीच्या कामावर देखरेख करताना आणि सीएससीच्या गुणवंत कामगारांना प्रशस्तिपत्रे देताना)
केंद्रीय मंत्री श्री भूपेंद्र यादव, कामगार आणि रोजगार, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री श्री रामेश्वर तेली,सचिव,श्री सुनील बर्थवाल,यांच्यासह आयुक्त (मध्य), श्री डी.पी.एस नेगी आणि त्यांच्या समर्पित अधिकार्यांच्या समूहाने हे उद्दिष्ट साध्य केले आहे. नियोक्ते, कामगार संघटनांचे नेते, कर्मचारी, राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून ते यासाठी मोठ्या प्रमाणावर संसाधने एकत्रित करत आहेत, जनजागृती कार्यक्रमाची मालिका आयोजित करत आहेत आणि मुख्य कामगारांच्या एकत्रित प्रयत्नांनी विशेष शिबिरेही आयोजित करत आहेत. देशातील विविध क्षेत्रांत आतापर्यंत 60 हून अधिक विशाल शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
{ श्रम आणि रोजगार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री,श्री रामेश्वर तेली,मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय)डी.पी.एस. नेगी, यांच्यासह ई-श्रम जागृती कार्यक्रमात }
24 ऑगस्ट रोजी नोंदणी सुरू झाल्यापासून, मागील 12 आठवड्यांमध्ये ई-श्रम पोर्टलवरच्या नोंदणीच्या संख्येत {झालेल्या वाढीचा आठवडावार डेटा, } आणि 10व्या आठवड्यात (2-8 नोव्हेंबर) कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे (1,15, 66,985 नोंद) . त्यानंतर 7 व्या आठवड्यात (12-18 ऑक्टोबर) - 86,83,881 जणांची नोंदणी झाली आहे. गेल्या चार दिवसांत, म्हणजे 17 ते 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत, सुमारे 57,24,286 जणांची नोंदणी ई-श्रम पोर्टलवर झाली आहे. (खालील आकृती पहा).
{ सीएससी, स्वयं किंवा राज्य सेवा केंद्रांद्वारे ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी}
ई-श्रम पोर्टलमध्ये असंघटित कामगारांची नोंदणी कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी), स्वतः:च्या स्वतः किंवा राज्य सेवा केंद्रांद्वारे होऊ शकते. सीएसटी द्वारे नोंदणी करणाऱ्यांच्या नोंदणीचा यात जास्तीत जास्त हिस्सा नोंदवला जात आहे, त्यानंतर नोंदणीचा सेल्फ मोड वापरणारे आणि राज्य सेवा केंद्राचा यात किरकोळ वाटा आहे. ई-श्रम पोर्टलवर सीएससीद्वारे नोंदणी करणाऱ्यांची संख्या त्यानंतरच्या आठवड्यांपासून ते 20 नोव्हेंबरपर्यंत 6,77,14,523 इतकी नोंदवत (खालील आकृती) वाढत आहे.
5 ऑक्टोबर 2021 पासूनच्या, मागील सहा आठवड्यांत, राज्य सेवा केंद्रांद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणीत वाढ झाली आहे, मागील आठवड्यात (9 ते 16 नोव्हेंबर 2021) सर्वात मोठी वाढ झाली असून ती 24,842 वरून 53,970 म्हणजे जवळजवळ दुप्पट झाली आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत ही संख्या 86,067 इतकी झाली आहे.
भारतात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सीएससी किंवा सेल्फ मोडद्वारे नोंदणी करणाऱ्यांमध्ये विशेष करून 16 सप्टेंबरपासून वाढ झाली आहे आणि सध्या दररोज किमान 11 लाख कामगारांची नोंदणी सीएससीद्वारे केली जात आहे , तर सुमारे 2 लाख स्वयं-नोंदणीसाठी आणि जवळपास 7 हजार कामगारांनी राज्य सेवा केंद्रांद्वारे नोंदणी केलीआहे.
20 नोव्हेंबर 2021 पर्यंत राज्य सेवा केंद्रांच्या नोंदणीचा एकूण नोंदणीत किमान 60टक्के वाटा आहे आणि त्यानंतरच्या आठवड्यात त्यांचा हिस्सा सध्या सुमारे 80% पर्यंत वाढला आहे, जो खालील आकृतीत दर्शविला आहे.
{ ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणीचा राज्यवार आलेख}
गेल्या 12 आठवड्यांमध्ये, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये ई-श्रम पोर्टलवर कामगारांच्या नोंदणीत सरासरी 15% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
12व्या आठवड्यात (9 ते 16 नोव्हेंबर 2021) ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल राज्यांत अधिक झाली होती आणि छत्तीसगड, झारखंड, पंजाब, ओडिशा आणि बिहारमध्ये माफक प्रमाणात झाली होती
{ ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणीचा व्यवसायानुसार आलेख}
24 ऑगस्ट ते 16 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पोर्टलवरील व्यावसायिक श्रेणीत नोंदणी केलेल्या एकूण कामगारांच्या संख्येच्या संदर्भात, कृषी, बांधकाम, परिधान, ऑटोमोबाईल आणि वाहतूक तसेच आणि घरगुती कामगार या सर्वोच्च पाच श्रेणी आहेत. नोंदणीच्या एकूण संख्येनुसार या व्यावसायिक श्रेणींची क्रमवारी कालांतराने बदलत गेली. याव्यतिरिक्त, गेल्या महिन्यापासून, कॅपिटल गुड्स आणि मॅन्युफॅक्चरिंगने पाचवी सर्वात महत्त्वाची व्यावसायिक श्रेणी (खालील तक्ता पहा) म्हणून स्थान मिळवले आहे.
20 नोव्हेंबर 2021 पर्यंत, या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांसाठी सर्वोच्च पाच व्यावसायिक श्रेणी आहेत , त्यात कृषी (53.2% आणि 4,48,76,425 नोंदणी), बांधकाम (12.1% आणि 1,02,58,713 नोंदणी), घरगुती कामगार) 8.8% आणि 74,22,236 नोंदणी, कपडे (6.3% आणि 52,89,110 नोंदणी) आणि कॅपिटल गुड्स आणि मॅन्युफॅक्चरिंग (3.3% आणि 27,60,050 नोंदणी) यांचा समावेश आहे. सर्व नोंदणीकृत कामगारांपैकी अर्ध्याहून अधिक कामगारांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे, कृषी कामगारांच्या आणखी दोन महत्त्वाच्या उप-श्रेणी म्हणजे ‘पीक शेत मजूर’ आणि ‘फील्ड क्रॉप आणि भाजीपाला उत्पादक’ (20 नोव्हेंबर 2021 रोजी सुमारे 20 लाख नोंदणीसह).
पोर्टलवर नोंदणीकृत महिला असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या शीर्ष पाच व्यावसायिक श्रेणींमध्ये कृषी (2.1 कोटी), घरगुती कामगार (71 लाख), परिधान (46 लाख), बांधकाम (23 लाख) आणि विविध (17.98 लाख) आहेत. त्या अनुषंगाने, पुरुष कामगारांसाठी शीर्ष पाच व्यावसायिक श्रेणी म्हणजे कृषी (2.3 कोटी), बांधकाम (78 लाख), ऑटोमोबाईल आणि वाहतूक (22.1 लाख), भांडवली वस्तू आणि उत्पादन (18.9 लाख) आणि विविध (7.7 लाख) यांचा समावेश यात आहे.
{ ई-श्रम पोर्टलवर मागील 12 आठवड्यांतील (24 ऑगस्ट - 16 नोव्हेंबर 2021) नोंदणीकृत असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रमुख व्यावसायिक गट दर्शवणारे तक्ता}
|
Top 5 Occupational categories for workers registering at the e-Shram portal
|
Week
|
1st
|
2nd
|
3rd
|
4th
|
5th
|
1st
|
Agriculture
|
Construction
|
Apparel
|
Automobile & Transportation
|
Domestic and Household Workers
|
2nd
|
Agriculture
|
Construction
|
Apparel
|
Domestic and Household Workers
|
Automobile & Transportation
|
3rd
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Automobile & Transportation
|
4th
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Automobile & Transportation
|
5th
|
Agriculture
|
Apparel
|
Automobile & Transportation
|
Beauty & Wellness
|
BFSI
|
6th
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Automobile & Transportation
|
7th
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Automobile & Transportation
|
8th
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Automobile & Transportation
|
9th
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Capital Goods & Manufacturing
|
10th
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Capital Goods & Manufacturing
|
11th
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Capital Goods & Manufacturing
|
12th
|
Agriculture
|
Construction
|
Domestic and Household Workers
|
Apparel
|
Capital Goods & Manufacturing
|
{ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांसाठी शीर्ष 5 व्यावसायिक श्रेणी}
{ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित क्षेत्रातील कामगारांचे वयोगट, उत्पन्न गट आणि आर्थिक समावेशानुसार वितरण}
पोर्टलवर गेल्या 12 आठवड्यांमध्ये नोंदणीकृत असंघटित क्षेत्रातील कामगारांची वयोगटानुसार रचना दर्शवते की '18-40' वयोगटातील कामगारांचा वाटा सर्वाधिक आहे, त्यानंतर '40-50' वयोगटातील कामगारांचा क्रमांक लागतो. (खालील आकृती पहा ). '18-40' वयोगटातील कामगारांसाठी वेगवेगळ्या वयोगटातील नोंदणीची साप्ताहिक सरासरी सर्वाधिक आहे आणि त्यानंतर '40-50' वयोगटातील कामगारांसाठी (अनुक्रमे 63 आणि 21 टक्के).
पोर्टलला आरंभ झाल्यापासून एकूण नोंदणीच्या संदर्भात, '18-40' वयोगटातील कामगारांच्या नोंदणीची संख्या पोर्टल सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 5 लाखांवरून वाढली आहे. 12व्या आठवड्यात (10-16 नोव्हेंबर)ही संख्या 4.8 कोटींवर पोहोचली आहे
20 नोव्हेंबर 2021 रोजी, '18-40' वयोगटातील एकूण नोंदणींची संख्या 5 कोटी (5,17,42,315) आणि '40-50' वयोगटातील संख्या 1.8 कोटी (1,88,18,074) इतकी आहे.
ई-श्रम पोर्टलच्या नोंदणीचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते, की पोर्टल सुरू झाल्यानंतर पहिल्या सहा आठवड्यांमध्ये, नोंदणी करणाऱ्या कामगारांमध्ये, पुरुष कामगारांचा वाटा किंचित जास्त होता (51% पेक्षा जास्त). तथापि, गेल्या सहा आठवड्यांमध्ये पुरुष कामगारांच्या तुलनेत महिला कामगारांचा वाटा जास्त झाला आहे (खालील आकृती पहा). अशा प्रकारे, पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या पुरुष कामगारांच्या तुलनेत महिला कामगारांमध्ये अधिक दिसून येत आहेत . 20 नोव्हेंबरपर्यंतच्या , एकूण नोंदणीपैकी 48.2% (4,06,86,429) पुरुष कामगार आणि 51.8% (4,37,00,713) महिला कामगार होत्या.
नोंदणीच्या पहिल्या आठवड्यात, नोंदणी झालेल्या एकूण कामगारांपैकी 12 व्या आठवड्यात सुमारे 5 लाख पुरुष आणि सुमारे 2.7 लाख महिला होत्या. (10 ते 16 नोव्हेंबर) 3.8 कोटी पुरुष आणि 4.05 कोटी महिलांची नोंदणी झाली आहे.
ई-श्रम पोर्टलवर लिंगाच्या दृष्टीने असलेल्या 'इतर' या प्रकारातील नोंदणी मंदावली आहे, 20 नोव्हेंबरपर्यंत एकूण 2,095 कामगारांची यात नोंदणी झाली आहेत.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करताना, असंघटित क्षेत्रातील कामगार त्यांच्या बँक खात्यांचा तपशील नॉमिनीच्या तपशिलांसह देऊ शकतात, पोर्टलवरील नोंदणीशी संबंधित सरकारी योजनांचे लाभ मिळवू शकतात, उदाहरणार्थ मृत्यू किंवा अपंगत्वाच्या बाबतीतील अपघात संरक्षण किंवा आंशिक अपंगत्व आल्यास बँक खाते आणि नॉमिनीचे तपशील असणे ही या योजनेची एक महत्त्वाची बाब आहे आणि सरकारने तयार केलेल्या कामगार आणि इतर समाजकल्याण योजनांत त्याचे विलीनीकरण केलेले आहे.
सुरुवातीला, पोर्टलवर नोंदणी करणार्या कामगारांतील थोडेसे कामगार त्यांच्या बँक खात्यांचा तपशील देत होते. तथापि, हा हिस्सा पहिल्या आठवड्यात 47% वरून 12व्या आठवड्यात 86.3% पर्यंत वाढला आहे (खालील आकृती पहा). याव्यतिरिक्त, पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचे नामनिर्देशित तपशील पहिल्या आठवड्यात केवळ 38% होते तर 12 व्या आठवड्यात 88% कामगारांनी प्रदान केले.
पोर्टलवर नोंदणी करणार्या कामगारांचे उत्पन्न-गटनिहाय विश्लेषण असे दर्शविते की एकूण नोंदणीकृत कामगारांपैकी 91% कामगारांचे सरासरी मासिक उत्पन्न 10000रु. पेक्षा कमी आहे. मासिक उत्पन्न 21000 रुपयेआणि त्यावरील उत्पन्न असणाऱ्या कामगारांचा हिस्सा फक्त 0.61% आहे. रुपये 10000 च्या उत्पन्न गटातील कामगारांचे प्रमाण पहिल्या आठवड्यात 86% वरून 12 व्या आठवड्यात सुमारे 92% पर्यंत वाढले आहे.
{ श्री डी.पी.एस. नेगी, मुख्य कामगार आयुक्त (मध्य) यांच्यासह उपमुख्य कामगार आयुक्त श्री आर.के.अग्रवाल आणि इतर अधिकारी ,वाराणसी आणि गोरखपूर येथे 20 आणि 21 नोव्हेंबर 2021 रोजी कर्मचारी, कामगार संघटना नेते, कामगार, मीडिया यांच्याशी ई-श्रम पोर्टलबद्दल चर्चा करताना.}
या प्रयत्नात , श्री डी.पी.एस. नेगी यांनी संघाचे नेतृत्व केले आणि विविध एअरलाइन्स (एअर इंडिया, विस्तारा, स्पाईसजेट, इंडिगो, गो एअरवेज इत्यादी), तसेच सीआयएसएफ, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार आणि वाराणसी येथे भारतीय विमानतळ प्राधिकरण,सीपीडब्ल्यूडी , केंद्रीय पीएसयू,एसपीसीएल,बीपीसीएल( PSUs ,SPCL,BPCL, इंडियन ऑइल) या ठिकाणी चार जागरूकता कार्यक्रम-नोंदणी शिबिरे वाराणसी आणि गोरखपूर येथे 19 ते 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत.
आयोजित केली.
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773839)
Visitor Counter : 286