ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या अंतर्गत गोदाम विकास आणि नियामक प्राधिकरणाकडून 'गोदाम नोंदणीचे महत्त्व आणि एफपीओ/पीएसीएसला होणारे ई-एनडब्ल्यूआरचे फायदे' या विषयावर वेबिनारचे आयोजन

Posted On: 21 NOV 2021 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग  भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा 'आयकॉनिक वीकसाजरा करत आहे.या उत्सवाचा एक भाग म्हणून, आज गोदाम  विकास आणि नियामक  प्राधिकरण (डब्लूडीआरए )च्या वतीने  शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ )/प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पीएसीएस ), नाबार्ड आणि छोटे शेतकरी कृषी व्यवसाय संघ यांच्या प्रतिनिधींसोबत वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.या वेबिनारला  विविध राज्यातील 120 हून अधिक सहभागींनी उपस्थिती लावली.

अध्यक्ष श्री. हरप्रीत सिंग यांनी वेबिनारचे उद्घाटन केले  आणि विविध राज्यातून सहभागी झालेल्या  प्राथमिक कृषी सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. त्यांनी शेताच्या बांधावर  गोदाम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक कृषी सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक संघटनांचे महत्त्व आणि नैसर्गिक फायदा यावर जोर दिला.एकत्रीकरणाच्या संमिश्र सेवा, वर्गीकरण/प्रतवारी, वित्तीय संस्थांद्वारे तारण वित्त प्रदान करण्यात मदत करणे  आणि सर्वोत्तम प्रक्रियेसाठी  मोठ्या प्रमाणातील सामूहिक शेतमालाची  योग्य वेळी विक्री आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे व्यवसाय मॉडेल  त्यांनी प्राथमिक कृषी सहकारी संस्था/शेतकरी उत्पादक संघटनांना सुचविले. शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने  प्राथमिक कृषी सहकारी संस्था/शेतकरी उत्पादक संघटना या त्यांच्या मालकीची गोदामे नसल्यास त्यांच्या परिसरात वापरात नसलेली  गोदामे भाड्याने घेऊ शकतात आणि  त्यांना गोदाम विकास आणि नियामक  प्राधिकरण मानकांमध्ये श्रेणीबद्ध  करू शकतात.

गोदाम विकास आणि नियामक  प्राधिकरणा विषयीची माहितीनोंदणी प्रक्रिया, सवलती आणि इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस पावती (ई -एनडब्ल्यूआर ), प्राथमिक कृषी सहकारी संस्था/ शेतकरी उत्पादक संघटनांसाठी अलिकडेच वाढवलेल्या फायद्यांसंदर्भात  गोदाम विकास आणि नियामक प्राधिकरणाने तपशीलवार सादरीकरण केले. गोदामांचे नोंदणी शुल्क लक्षणीयरीत्या कमी करून शेतकरी उत्पादक संघटना/प्राथमिक कृषी सहकारी संस्था/ स्वयंसहाय्यता गटांसाठी  500 रुपये करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. या आधी ते 5000 रुपये 30,000 रुपये होते.

गोदाम क्षेत्राचा विकास आणि ई -एनडब्ल्यूआरचे फायदे यावर एक लघुपट प्रकाशित  करण्यात आला. गोदाम कार्यक्षेत्रासंबंधीचे  सादरीकरण मेसर्स एनईआरएल द्वारे करण्यात आले.

नाबार्डचे श्री. जैनेंद्र अलोरिया  यांनी  प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांसंदर्भात विस्तृत सादरीकरण केले. नाबार्डकडून गोदामांच्या बांधकामासाठी दिल्या जाणारे  विविध अनुदान  आणि सहाय्याची माहिती त्यांनी दिली.

छोटे शेतकरी कृषी व्यवसाय संघाच्या श्री. विशाल यांनी  ई-नाम कार्यप्रणाली स्पष्ट केली आणि ई-नाम आणि ई -एनडब्ल्यूआर एकत्रीकरणाद्वारे कृषी विपणनाचे फायदे अधोरेखित केले.

 

 

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773769) Visitor Counter : 220


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu