श्रम आणि रोजगार मंत्रालय
सप्टेंबर 2021 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 15.41 लाखांपेक्षा अधिक नव्या सदस्यांची भर
प्रविष्टि तिथि:
20 NOV 2021 10:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या यादीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ईपीएफओच्या सदस्यांच्या यादीत सुमारे 15.41 लाख सदस्यांची वाढ झाली आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात लाखांहून अधिक नव्या सदस्यांची नोंद झाली. 15.41 लाख पैकी सुमारे 8.95 लाख नवीन सदस्यांची प्रथमच ईपीएफ आणि एमपी कायदा , 1952 च्या तरतुदीअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. नव्याने झालेले सदस्य, बाहेर पडणाऱ्यांची अल्प संख्या आणि बाहेर पडलेल्या सदस्यांनी नव्याने घेतलेले सदस्यत्व यामुळे सदस्यसंख्येत वाढ झाली आहे.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1773611)
आगंतुक पटल : 255