अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निर्मला सीतारामन यांनी गिफ्ट सिटी , गांधीनगर येथे जीआयएफटी -आयएफएससीच्या पहिल्या भेटीदरम्यान वृद्धी आणि विकासावर चर्चा केली


अर्थमंत्र्यांनी आयएफएससीए (IFSCA)साठी 500 कोटींहून अधिक खर्चाच्या 3 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची घोषणा केली

Posted On: 20 NOV 2021 10:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021

केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली दोन अर्थ राज्यमंत्री आणि अर्थ मंत्रालय आणि कंपनी  व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या प्रतिनिधिमंडळाने  आज गिफ्ट सिटीला भेट दिली.  शिष्टमंडळाने गिफ्ट सिटी, गांधीनगर येथे भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या (IFSC) विकास आणि वृद्धीच्या  मुद्यांवर चर्चा केली.

भांडवली बाजार आणि बँकिंग आणि विमा यावरील दोन परस्परसंवादी सत्रे समांतरपणे  संबंधित सचिवांच्या अध्यक्षतेखालील  गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान गिफ्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यानंतर आयएफसीएसएच्या अध्यक्षांनी सादरीकरण केले. सादरीकरणांमध्ये जीआयएफटी-आयएफएससीच्या प्रवासातील सर्व पैलू म्हणजे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रारंभिक संकल्पना , त्यानंतरची प्रगती  आणि जीआयएफटीचा  दर्जा आणखी उंचावण्याचा मार्ग या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर, जीआयएफटी -आयएफएससीमधील वाढीच्या संधींबाबत खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती, ज्यात अर्थमंत्र्यांनी भाग घेतला आणि उपाय शोधून पुढे वाटचाल करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.

निर्मला सीतारामन यांनी या कार्यक्रमादरम्यान जाहीर केले की आर्थिक व्यवहार विभागाने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) च्या तीन प्रमुख प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. पहिला  प्रस्ताव होता IFSCA च्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी 200 कोटी रुपयांचा, ज्यात 100 कोटी रुपये अनुदान अनुदान म्हणून आणि उर्वरित 100 कोटी रुपये सरकारकडून कर्ज म्हणून देण्यात येणार आहेत. दुसरा प्रस्ताव होता IFSCA च्या आयटी  पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 269.05 कोटी रुपये आणि तिसरा IFSCA फिनतेक योजनेसाठी  45.75 कोटी रुपयांचा होता.

गिफ्ट  सिटी येथे जीआयएफटी -आयएफएससीच्या माध्यमातून भारताला जागतिक आर्थिक प्रवेशद्वार बनवण्याचा केंद्र  सरकारचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

सीतारामन यांनी गिफ्ट सिटीलाही भेट दिली आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची झलक त्यांना देण्यात आली. अर्थमंत्र्यांनी ऑटोमेटेड वेस्ट कलेक्शन सिस्टम (AWCS), अंडरग्राउंड युटिलिटी टनेल, बुलियन व्हॉल्टिंग सुविधा  तसेच इंडिया आयएनएक्सला भेट दिली. . भारतात सोन्याची मागणी जास्त असल्यामुळे जीआयएफटी -आयएफएससी  येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजबाबत  NSE IFSC, India INX आणि IFSCA कडून इंडिया आयएनएक्स येथे सीतारामन यांना  सादरीकरण करण्यात आले.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1773609) Visitor Counter : 253