मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
21 नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्योत्पादन दिन जागतिक मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाच्या पद्धती बदलण्यातून शाश्वत मत्स्य साठा आणि पोषक मत्स्य परिसंस्था निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याच्या संकल्पनेतून साजरा होणार
Posted On:
20 NOV 2021 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021
भारत सरकारच्या मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाअंतर्गत मत्स्यव्यवसाय विभाग आणि राष्ट्रीय मत्स्योत्पादन विकास, 21 नोव्हेंबर 2021 रोजी ओदिशा येथील भुवनेश्वर येथील मंचेश्वर रेल्वे सभागृह येथे ‘जागतिक मत्स्योत्पादन दिवस’ साजरा करणार आहे.
केंद्रीय मत्स्योत्पादन , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री पुरुषोत्तम रुपाला, मत्स्योत्पादन , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मत्स्योत्पादन मंत्रालयाचे सचिव श्री. जतींद्र नाथ स्वेन, एनएफडीबीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सी. सुवर्णा, भारत सरकारचे (मत्स्योत्पादन) सहसचिव श्री सागर मेहरा, ओडिशा सरकारचे आयुक्त आणि सचिव श्री आर. रघु प्रसाद, या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.मत्स्योत्पादन विभाग, ओदीशा आणि मत्स्योत्पादन विभागाचे विविध राज्यांचे अधिकारी आणि इतर संबंधित विभाग/मंत्रालये, मत्स्य-शेतकरी, मच्छीमार, मत्स्यपालक, उद्योजक, भागधारक, व्यावसायिक, अधिकारी आणि देशभरातील शास्त्रज्ञ देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान, मत्स्योत्पादन क्षेत्रात भारत सरकार दुसऱ्यांदा 2020-21 साठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांना पुरस्कार देईल.अंतर्देशीय, सागरी, डोंगराळ आणि ईशान्य क्षेत्रातील सर्वोत्तम जिल्हा, सर्वोत्कृष्ट अर्ध सरकारी संस्था/महासंघ /महामंडळे
या शिवाय, सर्वोत्कृष्ट मत्स्योत्पादक , सर्वोत्कृष्ट उबवणी केंद्र (मासे, कोळंबी आणि उबवणी केंद्र), सर्वोत्कृष्ट मत्स्यपालन उपक्रम, सर्वोत्कृष्ट मत्स्यपालन सहकारी संस्था/शेतकरी कंपन्या /स्वयंसहाय्यता गट, सर्वोत्कृष्ट वैयक्तिक उद्योजक, सर्वोत्कृष्ट नवोन्मेष कल्पना /तंत्रज्ञान समावेश यासाठी पुरस्कार प्रदान केले जातील.
कार्यक्रमादरम्यान, तांत्रिक सत्रे देखील आयोजित केली जाणार आहेत. त्यात आयसीएआर -सीआयएफचे शास्त्रज्ञ दुपारच्या सत्रात सहभागी होतील. व्यापक प्रसारण होण्यासाठी संपूर्ण कार्यवाहीचे थेट-प्रक्षेपणही केले जाणार आहे.
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773532)