आदिवासी विकास मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी गौरव दिनानिमित्त 50 नवीन एकलव्य आदर्श निवासी शाळांची पायाभरणी केल्यानंतर एकलव्य शाळांच्या बांधकामाला वेग


7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 26 जिल्ह्यांमध्ये नवीन एकलव्य आदर्श निवासी शाळा स्थापन केल्या जातील

Posted On: 20 NOV 2021 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 'आदिवासी  गौरव दिनी ' 15 नोव्हेंबर 2021 रोजी  भोपाळमधून  50 शाळांची व्हर्चुअल पायाभरणी केल्यानंतर एकलव्य शाळांच्या बांधकामाला मोठी चालना मिळाली आहे.  7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 26 जिल्ह्यांमध्ये या शाळा उभारल्या जात आहेत.

नरेंद्र मोदी यांनी या शाळांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, संपूर्ण भारतात 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू केल्या जातील. 50 टक्के पेक्षा जास्त अनुसूचित जातीची  लोकसंख्या आणि किमान 20,000 आदिवासी व्यक्ती असलेल्या प्रत्येक तालुक्यात  अशा शाळा असतील. या 50 शाळांपैकी 20

 शाळा झारखंडमध्ये, 20 ओडिशामध्ये, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 4, महाराष्ट्रात 3, मध्य प्रदेशमध्ये  2 आणि त्रिपुरा आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये प्रत्येकी एक शाळा आहे. या शाळा देशातील डोंगराळ आणि वनक्षेत्रात आहेत  आणि त्यांचा फायदा देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या मुलांना होतो.

पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी समारंभाला प्रमुख ठिकाणी  मान्यवर उपस्थित होते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह मोठ्या धूमधडाक्यात तो साजरा करण्यात आला. झारखंडमधून आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा उद्‌घाटन कार्यक्रमात जिथे 20 शाळांचे उद्‌घाटन करण्यात आले तिथे सहभागी झाले. छत्तीसगडमध्ये आदिवासी व्यवहार राज्यमंत्री रेणुका सिंह सरुताछत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील बतौली तालुक्यातील  EMRS साइटवर उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773473) Visitor Counter : 231