माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

52 व्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्या गोव्यात उद्घाटन


केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

चित्रमहोत्सवामध्ये देशभरातल्या 75 सर्जनशील युवकांचा सहभाग

इफ्फीबरोबरच प्रथमच ‘ब्रिक्स’ देशांच्या चित्रपटांचाही महोत्सव

यंदा प्रथमच ‘ओटीटी’मंचाचाही महोत्सवामध्ये वापर करण्यात येणार

73 पेक्षाही जास्त देशांमध्ये निर्माण झालेल्या चित्रपटांचे प्रदर्शन होणार

यंदाचा ‘भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्काराने ख्यातकीर्त अभिनेत्री हेमामालिनी यांचा गौरव करणार

पणजी, 19 नोव्‍हेंबर 2021 

 

चित्रपट प्रेमींना ज्या महोत्सवाची  अतिशय उत्सुकता असते आणि ते ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पहात असतात, त्या महोत्सवाच्या उद्घाटनाला आता अवघे काही तास राहिले आहेत. या चित्रपट महोत्सवामुळे सिने क्षेत्रात कार्यरत असणा-यांचा आणि सर्व चित्रप्रेमींचा अनुभव समृद्ध होतो.  विविधतेच्या प्रेरणेने भरलेल्या उत्सवात रंगण्याची वेळ आता आली आहे.

होय, आशियातल्या सर्वात जुन्या आणि भारतातल्या सर्वा मोठ्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात करण्यात येत आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 52 व्या आवृत्तीला उद्या- दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी गोव्याच्या सोनरी किनारपट्टीवर रंगतदारपणे प्रारंभ होत आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सन्माननीय उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि मत्सोद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगनही उपस्थित राहणार आहेत.

हा चित्र महोत्सव म्हणजे जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या प्रदर्शनाचा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. सन 1952 मध्ये सुरू झालेल्या या चित्रपट महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सध्या हा महोत्सव गोवा राज्यात होत आहे.

यंदा दि. 20 ते 28 नोव्हेंबर,2021 या कालावधीत इफ्फीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध देशांच्या चित्रपट संस्कृतीला, त्या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या कलाकृतीचे कौतुक करण्यासाठी इफ्फीमुळे अतिशय चांगले व्यासपीठ मिळते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा एंटरटेनमेंट सोसायटी, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचा प्रारंभ गोव्यातल्या पणजी येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये अनेक रूपेरीपटावरील तारे-तारकांच्या उपस्थित होईल. यावेळी सलमान खान, रणवीर सिंह, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, श्रद्धा कपूर, आदि उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या इफ्फीमध्ये जगभरातल्या 300 पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर आणि दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध अभिनेता मनीष पॉल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

सध्या कोविड-19 महामारीचा धोका लक्षात घेवून यंदा इफ्फीचे कार्यक्रम संमिश्र स्वरूपात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमींना आपल्या घरी बसून आरामात चित्रपट पाहण्याचा आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध असणर आहे.

इफ्फीमधील चित्रपट:-

यंदा इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागामध्ये सुमारे 73 देशांच्या 148 चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुमारे 12 चित्रपटांचा जागतिक प्रिमियर आणि 7 अ95 आंतरराष्ट्रीय प्रिमियर, 26 अशिया प्रिमियर आणि 64 भारतीय प्रिमियर असणार आहेत. या महोत्सवासाठी  95 देशांतून 624 चित्रपट प्रदर्शनासाठी आले आहेत. याआधीच्या आवृत्तीमध्ये 69 देशांतून चित्रपट प्रदर्शनातून आले होते.

या चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ कार्लोस सॉरा दिग्दर्शित ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ या चित्रपटाने होणार  आहे. हा आंतरराष्ट्रीय प्रिमियर आहे. व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार विजेत्या जेन कॅम्पियन यांनी दिग्दर्शित केलेला ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटाची ‘मिड फेस्ट फिल्म’ म्हणून निवड करण्यात आली आहे. दिग्दर्शक असगर फरहादी यांचा ग्रँड प्रिक्स पुरस्कार विजेता ‘ए हिरो’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

इफ्फीच्या जागतिक पॅनोरमा विभागामध्ये जगातल्या 55 चित्ररत्नांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. तर महोत्सवात ‘कॅलिडोस्कोप’मध्ये 11 चित्रपटांची मेजवानी चित्ररसिकांना मिळणार आहे. यामध्ये टीटाने या फ्रेच आणि सौवाद या अरेबिक चित्रपटांचा समावेश आहे.

रिट्रोस्पेटिव्ह विभाग -

52 व्या इफ्फीमध्ये रिट्रोस्पेटिव्ह विभागात प्रसिद्ध हंगेरियन चित्रपट निर्माते बेला टा आणि रशियन चित्रपट निर्माते आणि नाट्य दिग्दर्शक आंद्रेई कोन्चालोवस्की यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

चित्रपट निर्माते बेला टा यांची दृष्य चित्रीकरणाची एक स्वतंत्र शैली आहे. त्यांच्या चित्रपटांना बर्लिन, कान्स आणि लोकार्नो चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.

कोन्चालोवस्की यांच्या चित्रपटांनाही विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये अॅकोलडस्, कान्स, ग्रँड प्रिक्स या महोत्सवांमध्ये विशेष ज्यूरी पुरस्कार मिळाले आहेत. तसेच दोन सिल्व्हर लायन्स आणि तीन गोल्डन ईगल पुरस्कार आणि एक प्राईमटाईम एमी पुरस्कारही मिळाला आहे.

भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व -वर्ष 2021

इफ्फीच्या उद्घाटन समारंभामध्ये ख्यातकीर्त अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांचा यंदाचे ‘भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नामवंत गीतकार आणि  सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांचा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय सिने क्षेत्रामध्ये अनेक दशके त्यांनी केलेल्या कारकिर्दीचा हा गौरव करण्यात येणार आहे.

गमावलेल्या ता-यांना श्रद्धांजली -

इफ्फीच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये चित्रपट क्षेत्राने आपल्या ज्या ता-यांना गमावले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. यंदाच्या आवृत्तीमध्ये बर्ट्रांड टवेर्निअर, ख्रिस्तोफर प्लमर, जीन-क्लूड कॅरिएर आणि जीन पॉल बेल्मॉन्डो यांना मान्यवरांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. तसेच भारतीय चित्रपट क्षेत्रातले महान दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता, अभिनेते दिलीप कुमार, अभिनेता नेदुमुडी वेणू, पुनीत राजकुमार, संचारी विजय, दिग्दर्शिका सुमित्रा भावे, अभिनेत्री सुरेखा सिक्री, चित्रपट संपादक वामन भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

मोठ्या रूपेरी पडद्यावरचे पहिले जेम्स बाँड सर शान कॉनेरी यांना विशेष आदरांजली या महोत्सवामध्ये वाहण्यात येणार आहे.

इफ्फीमध्ये प्रथमच -

75 सर्जनशील मने:-

या महोत्सवात पहिल्यांदाच 75 युवा चित्रपट निर्मात्यंाना, कलाकारांना, गायकांना, पटकथा लेखकांना आणि इतरांना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ देणार आहे. भारतामधल्या 75 सर्जनशील विचारांच्या युवकांना उद्योग क्षेत्राबरोबर जोडण्यासाठी महोत्सवात मास्टर क्लासेसमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देशातल्या तरूण चित्रपट निर्मात्यांची एका स्पर्धेच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे.

ब्रिक्स चित्रपट महोत्सव  -

ब्रिक्समध्ये सहभागी असलेल्या पाच देशांचे चित्रपट इफ्फीमध्ये ब्रिक्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. ब्रिक्य चित्रपटांची ही सहावी आवृत्ती आहे यामध्ये ब्राझिल, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारत या देशातले एकूण आठ चित्रपट प्रदर्शित केले जातील. ‘कंट्री ऑफ फोकस’ असा एक स्वतंत्र विभाग असून त्यामध्ये देशाच्या उत्कृष्ट सिनेमाचा परिचय  आणि त्याचे योगदान यांची माहिती देण्यात येणार आहे.

एनएफडीसीच्या ‘बाजार’ या चित्रपटाच्या आभासी प्रदर्शनाने या विभागाचे उद्घाटन होणार आहे.

ओटीटीबरोबर सहभागीता

यंदा प्रथमच ओटीटी मंचाचा सहभाग या महोत्सवामध्ये असणार आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेजॉन प्राइम, झी5, व्हूट आणि सोनी लाइव्ह यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या वतीने आभासी पद्धतीने मास्टर क्लासेस, कंटेट लॉन्च आणि पूर्वावलोकन, क्यूरेटेड फिल्म पॅकेज स्क्रिनिंग आणि इतर विविध विषयांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सच्या पॅरिस येथील प्रसिद्ध स्कूल ऑफ इमेज अँड आटर्स यांच्यावतीने तीन दिवसांचे मास्टर क्लासेस घेण्यात येणार आहेत.

नेटफ्लिक्सच्या वतीने जेन कॅम्पियन यांच्या ‘द पॉवर ऑफ द डॉग’ चा देशात प्रिमियर आयोजित करण्यात येणार आहे. रविना टंडन आणि आशुतोष राणा या कलाकारांची आगामी क्राइम थ्रिलर मालिका ‘अरण्यक’च्या पहिल्या भागाचे पूर्वावलोकनमध्ये प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच ‘धमाका’ या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग होणार आहे.

सोनी लाइव्हच्या वतीने स्कॅम -1992 चे पटकथा लेखक सुमित पुरोहित आणि सौरव डे यांचे मास्टर क्लास होणार आहेत. या कार्यक्रमाचे संचालन नेक्स्ट स्टुडिओच्या व्यवसाय प्रमुख इंद्राणी चक्रवर्ती करणार आहेत.

झी 5च्या वतीने ‘ब्रेकपॉइंट -  द पॉप्युलर पेस अँड भूपती’ मालिकेचा भाग दाखविण्यात येणार आहे. ही मालिका नितेश तिवारी आणि अश्विनी अय्यर यांची आहे.

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार -

52 व्या इफ्फीमध्ये आस्टेवान सझॅबो आणि मार्टिन स्कोअसेस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सझॅबो हे हंगेरियन दिग्दर्शक असून त्यांनी मेफिस्टो े(1981 आणि ) फादर (1966) या कालजयी सिनेमांची दिग्दर्शन केले आहे. मार्टिन हे नव्या हॉलिवूड युगातले प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले  जातात.  चित्रपट क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

इफ्फीचा समारोप असघर फरहादी यांच्या ‘ए हिरो’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स आणि कान्स चित्र महोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत.

याचबरोबर यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जवळपास 18 विशेष क्यूरेडेट चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

 

Exclusive glimpses from the preparations and rehearsals of 52nd @IFFIGoa's grand opening ceremony to be held at Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium, Goa on 20th November 2021#IFFI52

For details, visit👉 https://t.co/tSKgrrlpFL pic.twitter.com/LNUiwRAluy

— PIB India (@PIB_India) November 19, 2021

It is that time of the year when Goa is filled with vibrant colours, enthusiasm and cinema lovers 🤩

In just few hours, Asia's one of the most prominent film festival, @IFFIGoa will be underway

We are ready❗️ Are you❓#IFFI52 pic.twitter.com/8G3H3d9HFS

— PIB India (@PIB_India) November 19, 2021

Get ready to witness the 6th edition of BRICS film festival alongside #IFFI52

Russian film 'Odessa', directed by Valeriy Todorovskiy, based on the story of a family against the backdrop of the dramatic events of the 70s in Odessa, will be showcased during @IFFIGoa pic.twitter.com/WgxL3305Nj

— PIB India (@PIB_India) November 19, 2021

Come, Experience the “Soul of Asia” at #IFFI52

Drawn from various Asian countries, six films that have made their mark will be screened under the special section ‘Soul of Asia’

Read: https://t.co/XHe2bNhT7v pic.twitter.com/bwFEkUDvR0

— PIB India (@PIB_India) November 19, 2021

Renowned lyricist and Chairman CBFC, @prasoonjoshi_ to be honoured with 'Indian Film Personality of the Year' award at @IFFIGoa

He is also member of the Grand Jury for the ‘75 Creative Minds of Tomorrow’ at the #IFFI52

Video Courtesy: Prasoon Joshi Twitter pic.twitter.com/kD80DrqaF8

— PIB India (@PIB_India) November 19, 2021

🎦Finally! The wait is over and Screening schedule for day 1 to 4 of #IFFI52 is out now

Please book your seats and get ready for exciting journey into your dream sphere🎥🎞️ pic.twitter.com/bhOeXyyaH4

— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) November 19, 2021

Preparations are underway at @IFFIGoa venue as the mega film extravaganza is all set to enthral cine lovers with a wide range of Indian & international films

Here are some glimpses of the final touches before we welcome our guests at the grand opening ceremony tomorrow#IFFI52 pic.twitter.com/ap9VUNFNmj

— PIB India (@PIB_India) November 19, 2021

Exclusive glimpses from the preparations and rehearsals of 52nd @IFFIGoa's grand opening ceremony to be held at Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium, Goa on 20th November 2021#IFFI52

For details, visit👉 https://t.co/tSKgrrlpFL pic.twitter.com/LNUiwRAluy

— PIB India (@PIB_India) November 19, 2021

 

* * *

Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1773381) Visitor Counter : 232