अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या जीआयएफटी सिटी, गांधीनगर इथल्या चर्चेत भारत सरकारच्या सचिवांच्या पथकाचे नेतृत्व करणार

Posted On: 19 NOV 2021 2:26PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन, 20 नोव्हेंबर 2021 रोजी जीआयएफटी सिटी, गांधीनगर इथे भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या (आयएफएससी) विकास आणि वाढीच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सात सचिवांच्या पथकाचे नेतृत्व करतील. अर्थ राज्यमंत्री, पंकज चौधरी आणि डॉ. भागवत किशनराव कराड हे देखील चर्चेत सहभागी होणार आहेत.

भारतातील भारतीय कॉर्पोरेट्ससाठी जागतिक वित्तीय सेवांचे प्रवेशद्वार म्हणून जागतिक आर्थिक व्यवसाय भारताकडे आकर्षित करणे आणि फिनटेक ग्लोबल हब म्हणून वाढ करणे यात जीआयएफटी-आयएफएससीची भूमिका यावर चर्चेत लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री जीआयएफटी सिटी येथील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांनाही भेट देतील आणि आयएफएससी मध्ये उपस्थित विविध भागधारक/संस्थांशी संवाद साधतील. भारताचे प्रमुख वित्तीय सेवा केंद्र आणि भारतातील आणि बाहेरील जागतिक आर्थिक प्रवाहाचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून जीआयएफटी-आयएफएससी विकसित करण्यासाठी भारत सरकारची वचनबद्धता ही भेट अधोरेखित करते. या चर्चांमुळे जीआयएफटी-आयएफएससीच्या जलद विकासासाठी संकल्पना आणि धोरणांचा संगम होईल. याची निर्मिती देशांतर्गत आणि देशाबाहेरील आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीकोनातून करण्यात आली आहे आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या ध्यासाला मूर्त रूप दिले आहे.

या उद्दीष्टाचा पाठपुरावा करताना, जीआयएफटी-आयएफएससीसाठी एकत्रित वित्तीय क्षेत्र नियामक, जीआयएफटी सिटी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) यांनी जागतिक दर्जाचे वित्तीय नियम, प्रभावी पायाभूत सुविधा, प्रदान करण्यासाठी सहयोगी प्रयत्न केले आहेत. स्पर्धात्मक कर व्यवस्था आणि नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आर्थिक उत्पादने आणि सेवा जसे की विमान भाडेपट्टी, भांडवली बाजार व्यवहार आणि जागतिक इन-हाउस सेंटर्सचा शोध घेण्यासाठी भरपूर संधी यांचा समावेश आहे. फिनटेकला चालना देणारे आणि प्रयोगशाळांच्या रूपात नवउद्यमांच्या (स्टार्ट-अप्सच्या) आधारासाठी काही सर्वोत्तम-देशांतर्गत पायाभूत सुविधांसह आणि 'आयएफएससी बियॉंड बाऊंडरी फिनटेक फेस्टिव्हल' आणि हॅकेथॉनसारख्या जागतिक कार्यक्रमांसह, जीआयएफटी-आयएफएससी प्रदेशातील एक समृद्ध फिन्टेक हब म्हणून वेगाने उदयास येत आहे.

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773203) Visitor Counter : 207