वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध उत्पादन संलग्न प्रोत्साहनांना उद्योगांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद - गोयल


"व्यवसाय संबंधी खर्चाचे राज्यनिहाय मूल्यांकन करणे आणि राज्याच्या विशिष्ट त्रुटी दूर करण्यासाठी कृती करणे आवश्यक आहे"- पीयूष गोयल

गोयल यांनी राज्यांना पीएलआय प्रेरित उत्पादन वाढीचा लाभ घेण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये योग्य सुधारणा करण्याचे आवाहन केले

Posted On: 18 NOV 2021 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री,  पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, सरकारने विविध क्षेत्रांमध्ये जाहीर केलेल्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन  (PLI) योजनांमुळे कोविड नंतरच्या काळात  औद्योगिक आणि आर्थिक आघाडीवर सावरण्यास मदत  झाली आहे.

स्थानिक मूल्यवृद्धी आणि निर्यात (SCALE) संबंधी  सुकाणू समितीच्या आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना  गोयल म्हणाले की केंद्राने जाहीर केलेल्या विविध उत्पादन संलग्न प्रोत्साहनाबद्दल उद्योग क्षेत्राकडून अतिशय  सकारात्मक प्रतिसाद मिळत   आहे .यापैकी  वस्त्रोद्योग, वाहन निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू क्षेत्रातील पीएलआय योजना   वाढीला प्रोत्साहन देत आहेत.

वाहनांच्या सुट्या भागांच्या 1.3 ट्रिलियन  डॉलर्सच्या  जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा 15 अब्ज डॉलर्स इतका आहे. 2026 पर्यंत या सुट्या भागांची (ऑटो कॉम्पोनंट्सची)  निर्यात दुपटीने वाढवून  30 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

आपल्याकडे कारखान्यांमध्ये तयार  झालेल्या  उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक बनवण्यासाठी लॉजिस्टिक खर्च कमी करण्याची गरज अधोरेखित करून, त्यांनी राज्यांना राज्यांच्या विशिष्ट त्रुटी  दूर  करण्यास सांगितले. पीएलआय प्रेरित उत्पादन वाढीचा लाभ घेण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये योग्य सुधारणा करण्याचे आवाहनही वाणिज्य मंत्र्यांनी राज्यांना केले. "व्यवसाय संबंधी  खर्चाचे राज्यनिहाय मूल्यांकन करणे आवश्यक आहे," असेही त्यांनी नमूद केले. .

गोयल  यांनी उद्योजकांना  कमी मजूर खर्चाचा तसेच मोठ्या लोकसंख्येचा आणि आणि बाजारपेठेचा लाभ  घेण्यास सांगितले.

गोयल यांनी उत्पादन  क्षेत्राची मजबूत वाढ साध्य करण्यासाठी सुधारणेसाठी मुख्य क्षेत्रांची यादी तयार केली असून या क्षेत्रांमध्ये जमीन, कौशल्य विकास, सरकार आणि उद्योग भागीदारी आणि आदर्श  कामगार कायद्याचे पालन यांचा समावेश आहे.

मोठ्या प्रमाणात स्थानिकीकरण साधल्याबद्दल आणि CFL-मुक्त कूलिंग तंत्रज्ञानाकडे वळल्याबद्दल एअर कंडिशनर उत्पादकांचे गोयल यांनी कौतुक केले. वाहन निर्मिती  क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेकडे वळताना  चुंबक आणि इलेक्ट्रिक मोटर्सचे स्वदेशी उत्पादन वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772951) Visitor Counter : 159