अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 90 कोटी रुपयांच्या 12.9 किलो हेरॉईनसह 2 जणांना अटक केली.

प्रविष्टि तिथि: 13 NOV 2021 7:43PM by PIB Mumbai

 

अंमली पदार्थ  तस्करीविरोधात  लढा अधिक तीव्र करत सीमाशुल्क अधिकार्‍यांनी  नवी दिल्ली येथील  इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणखी एका यशस्वी कारवाईत 12 आणि 13 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्री नैरोबी (केनिया) येथून अबू धाबी मार्गे आलेल्या युगांडाच्या दोन  नागरिकांकडून 12.9 किलो हेरॉईन जप्त केले.  जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत प्रचलित आंतरराष्ट्रीय किमतीनुसार अंदाजे 90 कोटी रुपये आहे.

Picture 1Picture 2

युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण 12.900 किलो क्रिस्टलिन  हेरॉईन जप्त करण्यात आले. 

Picture 3Picture 4

या कॅलेंडर वर्षात दिल्ली सीमाशुल्क विभागाने  100 किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केले आहे. 26 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1771560) आगंतुक पटल : 274
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu