नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
इरेडाने केली सर्वकालीक उच्च अर्धवार्षिक करभरणी केल्यानंतरच्या नफ्याची नोंद
Posted On:
13 NOV 2021 4:20PM by PIB Mumbai
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) अंतर्गत येणारा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारतीय अक्षय ऊर्जा विकास महामंडळ या उपक्रमाने (IREDA), दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या अर्ध-वार्षिक -1 आणि 2021-22 च्या तिमाही-लेखापरीक्षणाचा आर्थिक अहवाल आज जाहीर केला.
कंपनीने कामकाजातून उत्पन्न रु. 684.80 कोटी आणि आर्थिक वर्षात 22 (FY22 साठी)करभरणी नंतरचा सर्वकालीन सहामाही नफा एकूण रु. 110.27 कोटी (PAT)रु.मिळाल्याचे जाहीर केले आहे. तसेच सर्वकालीन अर्धवार्षिक करभरणी केल्यानंतरचा नफा (PAT) रुपये 299.90 कोटी मिळाल्याची नोंद केली आहे.
इरेडाच्या(IREDA) संचालक मंडळाने 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या 2021-22 च्या सहामाही आणि तिमाही (H1 आणि Q2 FY) कालावधीच्या लेखापरीक्षण आर्थिक अहवालानिमित्त आज झालेल्या बैठकीत कंपनीच्या कामगिरीचे आणि विकासाचे कौतुक करत त्याला मान्यता दिली.
30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या अर्धवार्षिक निकालांचे गतवर्षीच्या आर्थिक वर्ष 2020-21 या कालावधीच्या तुलनेत दिसून आलेले काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
• करांमुळे मिळालेला वाढीव नफा रु.206.63 कोटी वरून 299.90 कोटी (सर्वकालीन उच्च)
• परीचालनामधून एकूण उत्पन्न रु.1284.94 कोटी वरून 1386.97 कोटी रु. इतके वाढले.(8% वृध्दी)
• अनुत्पादक मालमत्ता एनपीए (NPA) मधील एकूण घट (%): 5.79% वरून 4.87% (16% ने घट)
• निव्वळ मूल्य: रु. 2742.98 कोटी वरून रु. 3333.19 कोटी (22% वृद्धी)
आर्थिक वर्ष 2020-21 मधील कालावधीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 (Q2 FY 2021-22) च्या सहामाहीतील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:
° कर्ज मंजूरी: रु. 1172.32 कोटी वरून रु. 3584.90 कोटी (405 % वृद्धी)
° कर्ज वाटप: रु.2041.34 कोटीवरून 3584.90 रु.कोटी (76% वृद्धी)
***
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771439)