आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19 अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 13 NOV 2021 9:13AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 111.40 कोटी कोविड प्रतिरोधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशभरात गेल्या 24 तासांमध्ये  11,850 नवीन रूग्ण आढळले आहेत. 

कोरोना आजारातून बरे होणा-या रूग्णांचा दर सध्या 98.26 टक्के आहे. मार्च 2020 च्यानंतर हा दर सर्वात अधिक आहे.

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 12,403 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. देशभरामध्ये आत्तापर्यंत एकूण 3,38,26,483  रूग्ण या आजारातून मुक्त झाले आहेत.

आतापर्यंतच्या एकूण कोरोना रूग्णांपैकी सक्रिय  रुग्णसंख्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.40 टक्के आहे. मार्च 2020 च्यानंतर हा दर सर्वात कमी आहे.

भारतामध्ये सध्या 1,36,308 सक्रिय रूग्ण आहेत.गेल्या 274 दिवसांमध्ये सर्वात कमी 

दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी दर (0.94%) इतका असून गेल्या 40 दिवसांपासून हा दर 2 टक्के पेक्षा कमी. 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.05%) इतका आहे,गेल्या 50 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

आत्तापर्यंत एकूण 62.23 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.


***

 

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1771395) आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam