पर्यटन मंत्रालय
देशातील आदरातिथ्य आणि पर्यटन उद्योग मजबूत करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या
Posted On:
12 NOV 2021 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021
ठळक वैशिष्ट्ये -
- पर्यटन मंत्रालयाने यापूर्वी इझी माय ट्रिप, क्लियरट्रिप, यात्रा डॉट कॉम, मेक माय ट्रिप आणि गोआयबीबो सोबत अशा प्रकारचे सामंजस्य करार केले आहेत.
आदरातिथ्य आणि पर्यटन उद्योगाला बळकटी देण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांअंतर्गत पर्यटन मंत्रालयाने 10.11.2021 रोजी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळासोबत (IRCTC) सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या . पर्यटन मंत्रालयाने यापूर्वीच इझी माय ट्रिप, क्लियरट्रिप, यात्रा डॉट कॉम, मेक माय ट्रिप आणि गोइबीबो सोबत अशा प्रकारचे सामंजस्य करार केले आहेत.
ओटीए (OTA) प्लॅटफॉर्मवर साथी (आदरातिथ्य उद्योगासाठी मूल्यमापन, जागरुकता आणि प्रशिक्षण प्रणाली ) वर स्वयं-प्रमाणित केलेल्या निवास गृहांना व्यापक ओळख प्रदान करणे हा या सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश आहे. या सामंजस्य करारात निवास गृहांना निधी (NIDHI ) आणि त्याद्वारे साथी (SAATHI ) वर नोंदणी करण्यासाठी तसेच कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी योग्य सुरक्षा उपायांसह स्थानिक पर्यटन उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी चालना दिली जाणार आहे. योग्य धोरणात्मक उपायांची आखणी करण्यासाठी आणि सुरक्षित, सन्माननीय आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी निवास गृहांबद्दल अधिक माहिती संकलित करणे ही यामागची कल्पना आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या सहसचिवांच्या उपस्थितीत पर्यटन मंत्रालयाचे उपमहासंचालक (हॉटेल्स आणि रेस्टॉरंट) आणि संयुक्त महासंचालक, पर्यटन, आयआरसीटीसी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारतीय आदरातिथ्य आणि पर्यटन उद्योगाला बळकटी देण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी पर्यटन मंत्रालय आणि भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्यातील करारानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सामंजस्य कराराद्वारे भारतीय आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रातील धोरणात्मक आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालय आणि आयआरसीटीसी आवश्यक पावले उचलण्याचा प्रयत्न करेल.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771283)
Visitor Counter : 257