आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड - 19 अद्ययावत माहिती
Posted On:
12 NOV 2021 9:23AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत 110.79 कोटी कोविड प्रतिरोधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये 12,516 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे.
कोरोना आजारातून बरे होणा-या रूग्णांचा दर सध्या 98.26 टक्के आहे. मार्च 2020 च्यानंतर हा दर सर्वात अधिक आहे.
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 13,155 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. देशभरामध्ये आत्तापर्यंत एकूण 3,38,14,080 रूग्ण या आजारातून मुक्त झाले आहेत.
आतापर्यंतच्या एकूण कोरोना रूग्णांपैकी सक्रिय रुग्णसंख्या सध्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.40 टक्के आहे. मार्च 2020 च्यानंतर हा दर सर्वात कमी आहे.
भारतामध्ये सध्या 1,37,416 सक्रिय रूग्ण आहेत.
गेल्या 267 दिवसांमध्ये सर्वात कमी दैनिक ‘पॉझिटिव्हिटी दराची नोंद झाली आहे. हा दर 1.07 टक्के आहे.
गेल्या 39 दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षाही कमी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दराची नोंद होत आहे. सध्या हा दर 1.10 टक्के आहे. गेल्या 49 दिवसांपासून हा दर 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
आत्तापर्यंत एकूण 62.10 कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
***
Jaydevi PS/ SB/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771124)
Visitor Counter : 247