पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल  राज्यमंत्री  अश्विनी कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान मुख्य वन संरक्षक/वन दल प्रमुखांची  परिषद

Posted On: 11 NOV 2021 7:05PM by PIB Mumbai

 

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत  प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) / वन दलाच्या  प्रमुखांची (HoFF) परिषद झाली. विविध वनीकरण आणि वन्यजीव समस्या तसेच स्थानिक आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांवर चर्चा करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने  या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचे दुसरे सत्र  15 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे.

वन संवर्धन कायदा, 1980 अंतर्गत वन मार्ग बदल प्रकरणांच्या मंजुरीचे सुव्यवस्थापन, जंगलाबाहेरील परिसरात वृक्ष लागवड  वाढवणे आणि वृक्ष लागवड करणाऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नगर वन योजनेची अंमलबजावणी आणि आपल्या शहरी आणि निम-शहरी भागात वृक्ष लागवड  , नद्यांचे पुनरुज्जीवन  करण्यास मदत करणे, वन कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे आणि त्यांना सर्वोत्तम लॉजिस्टिक सुविधा पुरवणे आणि वृक्षतोड  आणि संक्रमण  परवानग्यांसाठी नियामक व्यवस्था सक्षम करणे यासारख्या विविध महत्त्वपूर्ण पर्यावरणीय समस्यांवर  या परिषदेत चर्चा केली जाईल.

'व्यवसाय सुलभता,  'लोकांना पडीक जमिनीवर झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करणे' आणि 'वन दलाची कार्यस्थिती आव्हानांना सामोरे जाण्यास अनुकूल बनवणे' यासाठी आवश्यक  सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे हे देखील  या परिषदेचे उद्दिष्ट आहे. वनीकरण, वन उत्पादन, वन्यजीव व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन या क्षेत्रांमध्ये राज्य सरकारांकडून राबवण्यात येत असलेल्या उत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा मंत्रालय लाभ घेईल.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771021) Visitor Counter : 184