आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 110 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात देण्यात आल्या देशभरात 57 लाखांहून अधिक मात्रा

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.25%

गेल्या 24 तासात 13,091 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या (1,38,556), गेल्या 266 दिवसातली सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.18%) गेले 48 दिवस 2% पेक्षा कमी

Posted On: 11 NOV 2021 9:51AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात 57,54,817 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 110   (1,10,23,34,225) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 1,12,38,854 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs

1st Dose

1,03,79,922

2nd Dose

92,97,352

 

FLWs

1st Dose

1,83,73,373

2nd Dose

1,61,02,356

 

Age Group 18-44 years

1st Dose

42,81,52,713

2nd Dose

16,02,59,021

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,72,47,072

2nd Dose

10,18,78,442

 

Over 60 years

1st Dose

11,11,04,883

2nd Dose

6,95,39,091

Total

1,10,23,34,225

 

गेल्या 24 तासांत 13,878 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,38,00,925 झाली आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.25% झाला आहे.

 

 

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 137 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

 

गेल्या 24 तासात 13,091 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

 

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,38,556  आहे, जी गेल्या 266 दिवसातली सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.40% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

 

 

गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,89,470 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.99 कोटींहून (61,99,02,064) अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.18% असून गेल्या  48 दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.10% असून गेले 38 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 73 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

 

****

Jaydevi PS /SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1770897) Visitor Counter : 205