विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधत तरुण संशोधकांसाठी पहिलावहिला मार्गदर्शक कार्यक्रम केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सुरू
Posted On:
08 NOV 2021 9:20PM by PIB Mumbai
विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) जितेंद्र सिंह यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधत युवा संशोधकांसाठी पहिलावहिल्या मार्गदर्शक कार्यक्रमाचा आज प्रारंभ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकांमध्ये विशेषतः युवा वर्गामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या हेतूने विज्ञान संशोधन आणि नवनवीन शोध लावण्याच्या प्रयत्नांना बळ देत अनेक पावले उचलली आहेत, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
या अखिल भारतीय योजनेनुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यात जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने स्टार महाविद्यालय राहावे यावर लक्ष पुरवण्यात येणार आहे. या योजनेत कार्यशाळा भरवणे, मासिक बैठका, महाविद्यालयात विशेषतः ग्रामीण भागातील किंवा संसाधनांची कमतरता असलेल्या भागातील महाविद्यालयात सखोल मार्गदर्शनासह मदतीचा हात व सरकारी शाळांमध्ये व्यापकता वाढवण्याविषयी कार्यक्रम यांचा समावेश असेल.या उपक्रमामुळे या योजने अंतर्गत आपला प्रवास सुरू करणाऱ्या नवीन महाविद्यालये, स्टार महाविद्यालय योजनेत समाविष्ट होण्यासाठी सक्षम होतील असे सिंह यांनी स्पष्ट केले.
देशातील एकूण 278 पदवी महाविद्यालये सध्या डीबीटी स्टार महाविद्यालय योजनेतून सहाय्य मिळवत आहेत.
सध्या ग्रामीण भागातील 55 महाविद्यालये आणि आकांक्षी जिल्ह्यातील 15 महाविद्यालये दोन वर्षाच्या अल्प कालावधीत या योजने अंतर्गत सहाय्य मिळवीत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
स्टार कॉलेज योजना, जैव तंत्रज्ञानातील कौशल्य विज्ञान कार्यक्रम हा कौशल्य विकासाचा कार्यक्रम, जैवतंत्रज्ञान औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि डॉक्टरेट तसेच पोस्ट डॉक्टरेट, फेलोशीप आणि इतर यासारख्या मनुष्य बळ संसाधनांशी निगडीत योजनांमध्ये लाभार्थीची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770132)
Visitor Counter : 278